शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला, तरी कुणाला काहीच कसे वाटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

जळगाव : कोरोनामुळे आधीच उद्योग-व्यावसायावर परिणाम झाल्यामु‌ळे, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांना दिवसेंदिवस ...

जळगाव : कोरोनामुळे आधीच उद्योग-व्यावसायावर परिणाम झाल्यामु‌ळे, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांना दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढत असल्यामुळे, नागरिकांच्या खिशाला अधिकच झळ बसत आहे. या पेट्रोल-डिझेल दर वाढीविरोधात विविध राजकीय पक्ष व संघटनांतर्फे आंदोलनेही करण्यात येत आहेत. असे असतांना सरकारकडुन पेट्रोल-डिझेल दर वाढीविरोधात कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमधुन सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊन पेट्रोल ९२ रुपये तर डिझेल ८० रुपये लिटरपर्यंत पोहचले आहे. या वाढत्या पेट्रोल-डिझेल दर वाढीचा सर्वाधिक परिणाम दळणवळणाच्या साधनांवर होत आहे. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, कृषी माल, उद्योजक-व्यावसायिकांचा माल आदी वाहतूक दारांनी मालाच्या वाहतूकीत भाडेवाढ केली आहे. मालवाहतूक दारांनी ही भाडेवाढ केल्यामुळे , परिणामी व्यापारी व उद्योजकानींही वस्तूंच्या किंमतीत वाढ करायला सुरूवात केली आहे. परिणामी याची सर्वाधिक झळ सर्व सामान्य नागरिकांना बसत असून, दैनंदिन जीवन जगणे या नागरिकांना अवघड होत आहे.

इन्फो :

बाहेरच्या मार्केटमध्ये कच्या तेलाचे भाव कमी असतानांही, केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे दर वाढ करण्याचे काम हेतूपुर्वक सुरू आहे. यामध्ये जनतेची पिवळणूक सुरू आहे. जर पेट्रोल, डिझेल व तेलाचे भाव असेच वाढत राहिले तर, सरकार विरोधात जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

देवेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस विद्यार्थी संघटना.

इन्फो :

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करुन, नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. सध्या ९२ रुपये पेट्रोल झाले असून, अजून आठ दिवसात शंभर रुपये पेट्रोल होईल. त्यामुळे मोदी सरकार नागरिकांना हेच अच्छे दिन दाखवित असून, वाढत्या महागाईचा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो.

अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी.

इन्फो :

कोरोनामुळे आधीच नागरिकांना काम-धंदा नसतांना, दुसरीकडे तेलासह विविध प्रकारच्या डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्व सामान्य गरिब नागरिकांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतांना, दुसरीकडे नोकरदार वर्गाला सरकारकडून भरघोस पगारवाढ देण्यात येत आहे.

निलम शैलेंद्र सपकाळे, गृहिणी.

इन्फो :

वाढत्या महागाईची नोकरदार वर्गापेक्षा सर्व सामान्य नागरिकाना आर्थिक झळ बसत आहे. तेलाचे भाव दिवसेंदिवस वाढत असतांना, किचनचे बजेट कोलमडत असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने महागाई कमी करायला हवी.

शालिनी संजय नेमाडे, गृहिणी.

इन्फो :

दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम

- पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम मालवाहतूकीच्या दरावर झाला आहे. कृषी माल, व्यापारी व उद्योजकांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी भाडेवाढ केल्यामुळे, शेतकरी व उद्योजकांना चांगलीच झळ बसत आहे. मालाची वाहतूक करणे परवडेनासे झाले आहे.

- मालाच्या वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे, उद्योजक व व्यावासायिकांनी हा खर्च काढण्यासाठी वस्तूंच्या किंमतीत वाढ करण्यात येत आहे. परिणामी याचा फटका सर्व सामान्य नागरिकांनाच बसत असून, वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.