शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीय असल्याची बतावणी करून पैसे उकळणा-यांना जळगावात बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:13 IST

जळगावातील गोलाणी मार्केटमधील प्रकार

ठळक मुद्देतृतीयपंथीयांनी दिला चोपकपडे काढून अर्धातासार्पयत धुलाई

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- साडी, ब्लाऊज परिधान करुन गोलाणी मार्केटमध्ये तृतीयपंथी असल्याची बनवेगिरी करीत पैसे उकळणा:या  दोन मद्यपींना येथील तृतीयपंथीयांनी बेदम चोप दिल्याची घटना गुरुवारी सकाळी 10़30  वाजेच्या सुमारास घडली़ अर्धा तासार्पयत गोंधळ सुरु असताना शहर पोलीस स्टेशनला प्रकार कळवूनही पोलीस न आल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, गोलाणी मार्केटमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास साडी, ब्लाऊज घातलेले व खांद्याला पिशवी लटकविलेले दोन जण दुकानदारांकडून पैसे वसूल करीत होत़े दारुच्या नशेत दोन जणांनी आठ ते दहा दुकानदारांकडून पैसे वसूलही केल़े एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याबाबत गोलाणी मार्केटमधील रहिवासी तृतीयपंथी जगन मामा यांना भ्रमणध्वनीवरुन हा प्रकार कळविला़ पैसे वसूल करणा:यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही, ते दिवसा वसुली व रात्री चो:याही करत असल्याचे ते म्हणाल़े  या प्रकारांमुळे तृतीयपंथीयांची बदनामी होते. नागरिकांनी कुठल्याही कार्यक्रमाला बोलविताना तृतीयपंथी कोण व कुठले आहेत, याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आह़े

कपडे काढून अर्धातासार्पयत धुलाईगोलाणी मार्केटमधील तृतीयपंथी राशी, अर्चना, काजल जान, सानिया हे घटनास्थळी  पोहचले व दोघा मद्यपींना चोप द्यायला सुरुवात केली़ यानंतर तृतीय पंथीयांनी त्यांचे कपडे काढले व त्यांना पुन्हा मारहाण केली़ दोघांची बनवेगिरी उघड झाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला तृतीयपंथीयांनी कळविले. मात्र अर्धातासार्पयत पोलीस आले नाही. त्यानंतर गर्दीतून वाट काढून दोघे पसार झाले, असे जगनमामा यांनी  सांगितल़े गोलाणी मार्केटमधील दुकानदारांसह बघ्यांची एकच गर्दी जमली होती़ सुमारे अर्धा तासार्पयत हा गोंधळ सुरु होता़