शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ए.टी.पाटील यांच्याकडील मेळाव्यात आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:29 IST

ए.टी.पाटील यांच्याकडील मेळाव्यात आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती

कैलास सोनवणे, चेतन सनकत यांचा समावेश : खासदारांनी दिले होते निमंत्रणजळगाव : भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांनी मंगळवारी पारोळा येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात जळगाव मनपाच्या आजी-माजी अशा १२ नगरसेवकांनी लावलेली उपस्थिती चांगलीच चर्चेची ठरली.मेळाव्यात भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, किशोर बाविस्कर, मनोज अहूजा, किशोर चौधरी, भरत कोळी हे विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक सुनील माळी, अशोक लाडवंजारी, नितीन पाटील, भाजपाचे पदाधिकारी प्रविण कुलकर्णी, वंदना पाटील, रेखा पाटील, भगवान सोनवणे आदी उपस्थित होते. भाजपाच्या इतर कोणत्याही बड्या नेत्याने या मेळाव्याला हजेरी लावणे टाळले आहे. तसेच भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून स्मिता वाघ यांचे नाव देखील जाहीर झाले असताना काही नगरसेवकांनी लावलेल्या हजेरीमुळे भाजपातील गट-तट पुन्हा समोर आले आहेत. दरम्यान, कैलास सोनवणे यांच्याशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.गिरीश महाजनांनी पाठविल्याची चर्चाए.टी.पाटील यांनी भाजपाच्या नगरसेवकांना या मेळाव्यात उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यानंतर कैलास सोनवणेंसह इतर नगरसेवकांनी या संदर्भात गिरीश महाजन यांना मेळाव्यात उपस्थित राहण्याबाबत विचारले असता त्यांनी या परवानगी दिली असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या मेळाव्यात भाषण करताना कैलास सोनवणे यांनी ए.टी.पाटील यांना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचे आवाहन केले. तसेच आपण भाजपाचे काम करा असेही कैलास सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे मेळाव्यात भाजपा नगरसेवकांना पाठवण्यामागे गिरीश महाजन असल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Politicsराजकारण