शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत चाळीसगावाला आज कृषि महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 19:00 IST

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन: शासकीय योजनांची जत्राही

ठळक मुद्देसप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन१५२ लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नएकाच छताखाली कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा आणि राज्यस्तरीय ४३ वे विज्ञान प्रदर्शन

चाळीसगाव, दि. ६ : चाळीसगाव येथे चार दिवस चालणा-या कृषि महोत्सवाची तयारी शुक्रवारी पुर्ण झाली. उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री सदाभाऊ खोत असतील. ९ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भेट देणार आहेत.खान्देशात प्रथमच एकाच छताखाली कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा आणि राज्यस्तरीय ४३ वे विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी नगरातील सिताराम पहेलवान यांच्या दोन एकर परिसरातील मळ्याच्या मोकळ्या जागेवर ७ ते १० असे चार दिवस हा महोत्सव होत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत राज्यभरातील बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शन शिक्षक विज्ञान प्रकल्प घेऊन प्रदर्शनस्थळी दाखल झाले आहेत.महोत्सवात कृषि मार्गदर्शन, शासकीय योजनांची जत्रा आणि विज्ञान प्रदर्शन याबरोबरच व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रशस्त व्यासपिठाची निर्मिती करण्यात आली आहे.१५२ लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या हा उपक्रम राबविला जात आहे. ४० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर महालॅबतर्फे रक्त तपासणी विनामुल्य करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेती करतांना विज्ञानाचा वापर करुन उत्पन्न कसे वाढवावे याविषयी प्रात्यक्षीक दाखविण्यात येणार आहे. सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर किर्तनही होईल. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Chalisgaonचाळीसगावagricultureशेती