शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या ‘सलीम’मुळे वाचले भाविकांचे प्राण

By admin | Updated: July 11, 2017 17:42 IST

अमरथान यात्रा : पिंपरखेड येथून 15 वर्षापूर्वी झाले होते बलसाड येथे स्थाईक

दिलीप पाटील/ ऑनलाईन लोकमत

पिंपरखेड ता. भडगाव,दि.11- अमरनाथ यात्रेला निघालेल्या बसवर 10 रोजी रात्री हल्ला झाला ‘त्या’ बसचा चालक सलीम गफूर पटेल हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपल्या प्राणाची पर्वा न करता बस भरधाव नेल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले. 
बसचालक सलीम जळगाव जिल्ह्यातला
सलीम (वय 27) हा मुळचा भडगाव तालुक्यातील पिंपरखेड  येथील रहिवासी आहे. सलीमचे वडील गफूर पटेल हे कामानिमित्त कुटुंबासह सुमारे 15 वर्षापासून बलसाड (गुजरात) येथे स्थायिक झाले आहेत. त्यांना बबलू, इकबाल, सलीम, आशिक अशी चार मुले आहेत. तीन मुले ड्रायव्हींगचे काम करतात तर सर्वात लहान मुलगा आशिक हा  टेलरींगचे काम करतो. सलीमचा विवाह झाला असून त्यास एक मुलगा व मुलगी आहे. पटेल कुटुंबियांची पिंपरखेड येथे शेती असल्याने यानिमित्ताने येणेजाणे होत असते. 
सलीमच्या भावाने साधला लोकमतशी संवाद
अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात 7 भाविक ठार तर 32 जखमी झाले. बसचालक सलीमचा भाऊ इकबाल याने ‘लोकमत’ शी दूरध्वानीवर माहिती दिली. बस सुरुवातीस सुरक्षा व्यवस्थेत इतर बसेस सोबत होती. मात्र बस पंर झाल्यामुळे ही बस मागे राहिली बसचे पंर टायर बदलल्यानंतर बस मार्गस्थ झाली. रस्त्यात दोन मोटरसायकलस्वार बस जवळून गेले व ते बसला सुरक्षा व्यवस्था नसल्याचे पाहून माघारी परतले. हे सलीमच्या लक्षात आले व त्याने वेगाने बस पुढे नेली. मात्र काही वेळातच अतिरेक्यांनी त्यांना गाठत बसवर गोळीबार केला.  अशा स्थितीतही सलीमने जिवाची पर्वा न करता बस पळवली. या दरम्यान 7 जणांचा मृत्यू झाला मात्र सलीमच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. त्याने घाबरुन जावून बस पळवली नसती तर आणखी अनेकांचे प्राण गेले असते अशी भीती इकबाल यांनी व्यक्त केली.