शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

सरावातूनच संगीताचे उत्तम धडे, उस्ताद अर्शद खान, पूजा गायतोंडे यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:13 IST

संगीत शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही

ठळक मुद्देगुरुंच्या सल्ल्याने वळले गझल गायनाकडेइसराज वाद्यास  300 वर्षाची परंपरा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 06-  संगीत शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, तर हे शिक्षण आपल्या सरावावर अवलंबून असत़े  सुरुवातीला प्रत्येक गोष्ट अवघड असते मात्र, त्यात आवड असेल तर लवकरच आपण त्यात यशस्वी होतो. अशाच प्रकारे सरावातूनत संगीताचे उत्तम धडे मिळू शकतात, असे मत इसराज वादक उस्ताद अर्शद खान व सुफी, गझल गायिका पूजा गायतोंडे यांनी व्यक्त केल़ेचांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित संगीत महोत्सवानिमित्त ते जळगावात आले असून शुक्रवारी दुपारी कांताई सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होत़े  सुफी, गझल व इसराद वाद्याचा प्रथमच बालगंधर्व सगीत महोत्सवात सामावेश करण्यात आला आह़े  तसेच गायन व वादन प्रकारात शास्त्रीय संगीताला अधिक महत्व असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितल़े

सुफी, गझल गायनासाठी शास्त्रीय संगीत महत्त्वाचेयावेळी पूजा गायतोंडे म्हणाल्या की, गझल आणि सुफी हे एकच आहे फक्त नाव वेगवेगळे आह़े  देवाला किंवा मौलांना उपदेशून जे गायिले जाते त्याला गझल किंवा सुफी म्हटले जात़े  यास मराठीत भजन असेही संबोधिले जात़े  सुफी, गझल गायन हे हिंदी किंवा उर्दू भाषेत अधिक चांगले वाटत़े  त्यासाठी शास्त्रीय संगीत हे खूप महत्त्वाचे असते, असेही त्या म्हणाल्या़ 

इसराज वाद्यास वाढती पसंतीउस्ताद अर्शद खान यांनी सांगितले की, इसराज हे वाद्य सितार वाद्यासारखे असून  पंजाबमध्ये दिलरुबा या नावाने ते ओळखले जाते. या इसराज वाद्याचा बॉलिवूडमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर वापर होत असून त्यास लोकप्रियताही तेवढीच मिळत आहे, असे खान यांनी सांगितल़े इसराज वाद्यास  300 वर्षाची परंपराउस्ताद अर्शद खान पुढे म्हणाले की,  इसराज हे वाद्य 300 वर्षापूर्वीचे असून कोलकता येथून हे वाद्य प्रसिध्दीस आले आह़े   त्या नंतर हे वाद्य पंजाबमध्ये दिलरुबा या वेगळ्या नावाने प्रसिध्दीस आल़े  मी सात-आठ वर्षाचा असताना माङया आजोबांपासून मला प्रेरणा मिळाली व  माङो वडील आणि अहेमद नंदन खान साहेबांकडून मी ही कला अवगत केली.  बॉलिवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान यांच्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये संगीत दिले असल्याचेही ते म्हणाले. 

गुरुंच्या सल्ल्याने वळले गझल गायनाकडे

पूजा गायतोंडे यांनी सांगितले की, लहान असताना त्यांच्या आईने त्यांना शास्त्रीय गायनासाठी क्लास लावला. त्यावेळी त्यांचे गुरु विकास भाटोळेकर यांनी त्यांचा आवाज ऐकून तू गझलकडे वळावे असा सल्ला दिला़  त्यानंतर मी गझलकडे वळली, असे गायतोंडे यांनी सांगितल़े  मी सुफी, गझलकडे वळल्यानंतर गझल  चांगल्या प्रकारे सादर करण्यासाठी मला उर्दू भाषेची अडचण येऊ लागली.  मला त्यासाठी उर्दू भाषा अवगत नसल्याने या अडचणी स्वाभाविक होत्या़  लोकांसमोर आपण काय सादर करतो त्यापेक्षा कसे सादर करतो हे जास्त महत्त्वाचे असल्याने मी उर्दू भाषाही शिकले, असेही गायतोंडे यांनी सांगितले.