शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावी प्रभाती सूर मनामनात रंगले, सोहम गोराणेच्या तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:52 IST

गझल, भक्तीगीत, नाटय़गीतांचे सादरीकरण

ठळक मुद्देउद्यानात रंगली दिवाळी पहाट सोहम गोराणेच्या जुगलबंदीने रसिक भारावले

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 21 - प्रभाती सुर नभी रंगले..असा सुरमयी आलाप छेडत जॉगिंग असोसिशएन आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला शनिवारी पहाटे साडेसहा वाजता सुवर्णा स्मृती उद्यानात सुरुवात झाली. पुणे येथील सुप्रसिद्ध तबला वादक शाम गोराणे, गायिका ज्योती गोराणे, श्रीराम पांढरे, बापू चौधरी, अकरा वर्षीय तबला वादक सोहम गोराणे या कलावंतांनी सुरमधुर गीतांचे सादरीकरण उपस्थित रसिक - श्रोत्यांची मने जिंकली. दीपप्रज्वलन व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, प.सं. सदस्य अजय पाटील  पालिकेचे गटनेते राजेंद्र चौधरी, ल.वि.पाठक, नगरसेविका सविता जाधव, रविंद्र चौधरी यांच्या उपस्थित झाले. 

वक्रतुंड समप्रभा स्तवनाने सुरुवात होऊन दिव्य तुज्या तेजाने, सुवास तुङो मोहुनी (नाटय़गीत), प्रभाती सुर नभी रंगती, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, मी राधिका प्रेमिका,  बगळ्यांची माळ फुले, चांदी जैसा रंग है तेरा, आज जाने की जीद न करो, हमे वो गुजरा जमना याद , विठु माऊली तु, उद्धवा अजब तुङो सरकार, गुरु परमात्मा, ऐंकलेली  वाचलेली माणसे गेली कुठे..अशी एकाहुन एक सरस भावगीते, अभंग, गझल सादर करण्यात आल्या. चाळीसगावची बारा वर्षीय स्नेहल सापनर हीने सत्यम शिवम सुंदरम हे गीत सादर करुन टाळ्या घेतल्या. 

सोहमच्या तबला वादनाने श्रोते भारावलेअकरा वर्षीय सोहम गोराणे याने तबला वादन करुन श्रोत्यांची वाहवा मिळवली. हार्मोनियम आणि तबल्याच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. सोहमला 500हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. नऊ महिन्याचा असल्यापासून तो तबला वादन करतोयं. स्वागत असो.चे अध्यक्ष दीपक देशमुख, सोपान चौधरी, प्रितेश कटारिया यांनी तर  प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. चंद्रकांत ठोंबरे यांनी केले. वसंत चंद्रात्रे, मिनाक्षी निकम यांच्यासह पाचशेहुन अधिक रसिकांनी कार्यक्रमाचा अस्वाद घेतला.