शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरजवळ पीपीई किट उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:13 IST

चाळीसगाव : संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चाळीसगाव : शहरातील अंध शाळेच्या वस्तीगृहातील कोविड केअर सेंटर जवळ असलेल्या बाप्पा पॉईंट जवळ रस्त्यावर दररोज कोणीतरी अज्ञात व्यक्ती कोरोनाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे पीपीई किट उघड्यावर टाकत आहे. यामुळे परिसरातील रहिवाश्यामध्ये खळबळ उडाली आहे. संबंधितावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.पीपीइ किट ( पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा उपकरण असून एखाद्याच्या संसगार्पासून यामुळे संरक्षण मिळते .हे साहित्य आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना दिले जाते. यात हात मोजे, पायमोजे, मास्क,गाऊन, डोक्याचे संरक्षण करण्यासाठी कव्हर, डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी गॉगल आदी सर्व वस्तू असतात. दरम्यान चाळीसगाव शहारसह ग्रामीण भागातील आतापर्यंत २०० ते ३०० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अंधशाळेतील मुलीच्या वस्तीगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये २० जण क्वारंटाईन आहेत. या कोविड केअर सेंटरपासून जवळच असलेल्या बाप्पा पॉईट रस्त्यालगत गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोणी तरी अज्ञात व्यक्ती पीपीई किट उघड्यावरुन फेकून जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. याच परिसरात जवळपास सात ते आठ मोठे हॉस्पीटल देखील आहेत. त्यामुळे हे पीपीई किट कोण उघड्यावर फेकतात . याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.