शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठ्याचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:18 IST

संबंधितांचे दुर्लक्ष : महिंदळे आणि परिसरातील नागरीक त्रस्त

महिंदळे, ता.भडगाव : महिंदळे व परिसरात भडगाव सबस्टेशन येथून वलवाडी फिडर मधून वीज पुरवठा होतो. परंतु पावसाचे दोन थेंब किंवा वाऱ्याची साधी झुळूक या वीज वाहिन्यांना सहन होत नाही. पाऊस सुरू होताच विज गुल होते व फॉल्ट घोषीत करून तासंतास तर कधी पूर्ण दिवस व रात्र वीज बंद ठेवण्याचा प्रकार येथे व परिसरात सुरू आहे. यामुळे ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत. अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन वेळ मारून नेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.परिसरातील शेतशिवारातील विज वाहिन्या अतिशय जिर्ण झाल्या असल्यामुळे व त्यांमध्ये झाडांच्या फांद्या गेल्याने पाऊस सुरू होत नाही तोच फॉल्ट होतो. हा फॉल्ट शोधण्यात पुर्ण दिवस जातो. रात्री जर पाऊस आला तर पुर्ण रात्र अंधारात काढावी लागते. अशातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डास, मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे झोपही व्यवस्थित होत नाही. वीज तासंतास जात असल्यामुळे ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत.कमी दाबाचावीजपुरवठाभडगाव येथील सबस्टेशन येथून वलवाडी फिडर मधून भडगाव ग्रामीण, वलवाडी, महिंदळे येथे वीज पुरवठा होतो. परंतु या परिसरात कमी दाबाचा विज पुरवठा करण्यात येतो. यामुळे घरगुती उपकरणे हे निकामी होतात .तर कधी जळतातही. घरातील पंखेही फिरत नाहीत.पावसाळ्यातच नव्हे तर परिसरातील वीज समस्या ही कायमचीच झाली आहे. या वीज समस्येचा यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होतो.या गंभीर समस्येकडे मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते.वलवाडी फिडरवर भडगाव अर्बन, वलवाडी, व महिंदळे हे शेवटच्या टोकाला असल्यामुळे नेमका फॉल्ट भडगाव अर्बन मध्ये होतो. तेथे कर्मचारी फॉल्ट काढण्यासाठी उपलब्ध होत नाहीत व या परिसरातील पावसाळ्यापूर्वी झाड्यांच्या फांद्याची कटाई झाली नसल्यामुळे व या फिडरवरील वीज तारा व इन्सूलेटर जिर्ण झाल्या असल्यामुळे झाडांच्या फांद्या त्यांमध्ये गेल्यामुळे नेहमी फॉल्ट होतो. आता वडजी येथील सबस्टेशन येथून वीज पुरवठा सुरळीत करत आहोत.- जी. एस. मोर, कनिष्ठ अभियंता म.रा.वि.म.भडगाव