शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकाराच्या उपासनेचे कुटुंबियांकडून मृत्यूपश्चात प्रदर्शन

By admin | Updated: April 15, 2017 18:25 IST

गुलजार गवळी यांचे अनोखे स्मरण : जे.जे.आर्ट गॅलरीत प्रदर्शनासाठी 2010 मध्ये केली होती बुकींग

ऑनलाईन लोकमत विशेष

जळगाव, दि.15- निसर्गाच्या सहवासात राहून नव अति वास्तववाद शोधत रंगांची दुनिया सजविणारे प्रसिद्ध चित्रकार व माजी प्राचार्य स्व.गुलजार गवळी यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चित्राचे प्रदर्शन कुटुंबियांनी मुंबई येथील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट येथे भरवित त्यांना अनोखी आदरांजली अर्पण केली आहे. प्रदर्शनातील मिनीएचर पेन्टींग, एरिअल इफेक्ट दाखविणा:या पेन्टींग कलारसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ये कोण चित्रकार है..
नंदुरबार जिल्ह्यातील भोरटेवाडा येथील मूळचे रहिवासी असलेले गुलजार गवळी यांनी 1970 च्या दशकात जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्ट मास्टरचे शिक्षण घेतले. तत्पूर्वी 1969 मध्ये कोल्हापूर येथे डिप्लोमा इन ड्राईंग अॅण्ड पेंटीगचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर खिरोदा येथील ललित कला भवनात साहाय्यक प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून सेवा सुरु केली. 33 वर्षाच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते. 10 ऑगस्ट 2014 रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.
 
गवळी यांच्या चित्रात नवअति वास्तववादाचा प्रभाव
गुलजार गवळी यांनी ऑईल पेन्ट, वॉटर कलर व ट्रेम्प्रा कलरद्वारे चित्र साकारले. त्यांनी देशविदेशात 27 पेक्षा जास्त चित्रप्रदर्शन भरविले. त्यांच्या चित्रांवर नव अति वास्तववादाचा प्रभाव राहिला होता. या माध्यमातून त्यांनी निसर्गाकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन आपल्या चित्रांमधून मांडला होता. आपल्या सेवाकाळात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. काश्मीरमधील सौदर्याचे ऑन दी स्पॉट स्वरुपाचे 30 चित्र त्यांनी रेखाटले आहेत.
 
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्र प्रदर्शनासाठी 10 वर्षापूर्वी बुकींग
कलेचे उपासक असलेल्या गुलजार गवळी यांनी आपल्या चित्राचे प्रदर्शन जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये भरविण्याची इच्छा होती. मात्र तत्पूर्वी 2014 मध्येच त्यांचे निधन झाले. पतीची मृत्यूपूर्वी चित्र प्रदर्शनाची इच्छा त्यांच्या पत्नी अंजली गवळी यांनी कुटुंबात बोलून दाखविली. मुलांनी देखील वडिलांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवित त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यास होकार दर्शविला. त्यानुसार 11 ते 17 एप्रिल दरम्यान गुलजार गवळी यांच्या निवडक 27 चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
 
फाईनलाईन आणि बोल्ड एरिअल इफेक्टला पसंती
गुलजार गवळी यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिदिन 700 ते 900 चित्ररसिक भेट देत आहेत. औरंगाबाद येथील भडखल दरवाजा व बोल्ड एरिअल इफेक्ट असलेल्या मसजिदच्या पेन्टींगला रसिकांची पसंती मिळत आहे. यासोबत 1970 ते 80 च्या दशकातील माऊंटन पेन्टींग तसेच फाईन आर्ट ड्राईंगला देखील पसंती मिळत आहे.
 
चित्रप्रदर्शनासाठी कुटुंबिय हजर
11 एप्रिल रोजी प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी परेश मकवाणा, डॉ.किसन पाटील, व्ही.एस.चित्रे, कुंदन बाविस्कर यांच्यासह त्यांच्या पत्नी अंजली गवळी, कुटुंबातील सदस्य मनिषा गुप्ता, गितांजली व्यास, सुशील व्यास, भाविन गवळी, सारंग गवळी, वेदांत शाह, हिमालय शाह उपस्थित होते.