नंदुरबार : शहरातील धुळे रस्त्यावरील गांधीनगर समोरील खड्डा अनेकांना जायबंदी करीत आहे. पालिका येथील ड्रेनेज स्वच्छ करीत नसल्यामुळे वाहणा:या पाण्यामुळे खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. दरम्यान, तातडीने उपाययोजना न केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी आणि सव्र्हिस सेंटरचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. धुळे रस्त्यावरील गांधीनगरसमोरील खड्डा अनेकांच्या जिवावर उठला आहे. गेल्या चार दिवसात या खड्डय़ात पडून दहा जण जखमी झाले. रात्रीच्या अंधारात या खड्डय़ाचा अंदाज येत नाही. शिवाय त्यात ड्रेनेजचे आणि सव्र्हिस सेंटरमधून निघणारे पाणी भरले असल्यामुळे त्याची तीव्रता कळत नाही. परिणामी दुचाकीचालक हमखास त्या खड्डय़ात पडून जखमी होत आहेत. बुधवारी रात्री देवीदर्शन घेऊन परत जाणा:या एका कुटुंबाची मोटारसायकल खड्डय़ात पडल्याने दोन लहान मुलांसह पती-प}ी जखमी झाले. शालेय विद्यार्थी सायकलसह येथे नेहमीच पडतात. या भागातील भूमिगत गटारीचे चेंबर जाम झाले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावरून वाहते. त्या पाण्यामुळेच येथे खड्डे तयार झाले आहेत. शिवाय याच ठिकाणी असलेल्या एका सव्र्हिस सेंटरचालकाने पाण्याचा निचरा करण्याची कुठलीही सोय केली नसल्याने ते पाणीदेखील सरळ रस्त्यावर येते. त्यामुळे येथील रस्ता नेहमीच खराब होत असतो. गेल्या आठ दिवसांपासून येथील खड्डय़ाची तीव्रता वाढली आहे. त्यात ड्रेनेजचे पाणी आणि सव्र्हिस सेंटरमधील पाणी भर घालत आहे. या प्रकाराकडे पालिकेनेही दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे पालिका दुरुस्ती करीत नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे आंधळ्याचे सोंग घेतले आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना जायबंदी व्हावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्त न झाल्यास आणि पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका अधिकारी आणि संबंधित सव्र्हिस सेंटर चालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी या ठिकाणी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा सामाजिक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
खड्डा करतोय अनेकांना जायबंदी
By admin | Updated: October 16, 2015 00:33 IST