शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘सिव्हिल’ जाणार ‘डीएमईआर’च्या ताब्यात

By admin | Updated: February 22, 2017 00:30 IST

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘सिव्हिल’ जाणार ‘डीएमईआर’च्या ताब्यात

जळगाव : जळगावात नियोजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जिल्हा रुग्णालयातून  सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा रुग्णालय वैद्यकीय तंत्रशिक्षण मंडळाच्या (डीएमईआर) ताब्यात द्यावे लागणार असून याबाबत आरोग्यमंत्र्यांकडून अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, या बाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना प्रस्तावाबाबत पत्र दिल्यानंतर त्यांनी आरोग्य संचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे.  जिल्ह्यात शासनातर्फे नवीन शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.   त्यासाठी                   प्रस्तावित जागांची पाहणी प्रधान सचिव राजगोपाल देवरा  यांनी  केली होती.कोठेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे झाल्यास तेथील शासकीय रुग्णालयाचा आधार घेतला जातो.  त्यानुसार जळगावातही या हालचाली सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पाच वर्षात पूर्ण करण्यात येऊन तेथे त्याला सुरुवात होईल. तो र्पयत म्हणजे पाच वर्षे जिल्हा रुग्णालयात ते सुरू राहू शकते. या बाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना प्रस्ताव सादर करण्याविषयी पत्र देण्यात आले आहे. या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांनी आरोग्य उपसंचालकांमार्फत आरोग्य संचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे. आरोग्यमंत्रीच घेणार निर्णयजिल्हा रुग्णालय वैद्यकीय तंत्रशिक्षण मंडळाच्या ताब्यात द्यायचे की नाही  या बाबत आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यात                   चर्चा होऊन तेच निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश                महाजन हे जळगाव जिल्ह्यातीलच असल्याने या बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचेही बोलले जात आहे. कर्मचा:यांचा प्रश्नजिल्हा रुग्णालय वैद्यकीय तंत्रशिक्षण मंडळाकडे गेले तर यामध्ये येथील कर्मचा:यांचाही प्रश्न येतो. ते मंडळाकडे जायचे की नाही या बाबत काय निर्णय घेतात,हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. या विषयी आरोग्य उपसंचालकांमार्फत संचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे. या बाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होईल. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काही कागदपत्रे मागितली तर ती पुरविण्यात येतील. - डॉ. सुनील भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक