शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘हत्तीचा बेंडबाजा’ लहान्यांसह सर्वांमध्येच ठरतेय लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:19 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी कवी प्र.अ.पुराणिक यांनी लिहिलेल्या ‘हत्तीचा बेंडवाजा’ या काव्यसंग्रहाचा करून दिलेला थोडक्यात परिचय.

‘एकदा जंगलात भरली सभा, सर्वांना यायची होती मुभा, सभेचा विषय होता एकात्मता, क्षणेैक झाली आत्मियता...’, ‘हत्ती एकदा गेला, बाजात कापड घ्यायला, पैसे मात्र नव्हते, त्याच्याजवळ द्यायला, हत्तीला पाहताच दुकानदार घाबरला...’ अशा काही बालकविता ‘हत्तीचा बेंडवाजा’ या काव्यसंग्रहातून वाचकांचे लक्ष वेधून घेतात. धुळे येथील साहित्यिक प्र.अ. पुराणिक यांचा हा काव्यसंग्रह आहे. या बालगीत संग्रहातील सगळ्याच कविता नाद, लय, ठेका घेऊन जन्मल्या आहेत. यात पक्षी, प्राणी, फुले, निसर्ग बालदोस्तांच्या भेटीला येतो आणि बालवाचकांच्या गुंगवून ठेवतो. प्र.अ.पुराणिक यांचे हे पंधरावे पुस्तक आहे. यातील सुंदर चित्रे आणि मनमोहक सजावट यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. कवीला बालमनाची नस अचूक अचूक सापडली आहे. अध्यापकीय व्यवसायाला साजेशा बालगीतात रमणारा हा कवी. ‘हत्तीचा बेंडवाजा’ हा बालगीत संग्रह त्यांनी असा काही सजवला आहे की, बालमनाला आपण हा संग्रह सोडून नये, असे वाटते. डोंगरदऱ्या, पशु-पक्षी, वन्यप्राणी, जलचर, वनचर या सर्वांसह सभोवतालच्या साºया सृष्टीला जणू बोलके करून त्यांनी बालकांची मने आपल्या कल्पना विश्वात झकास रमविण्याचा, रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कल्पना सामर्थ्यावरच मूकसृष्टी जणू चैतन्यमय झाली आहे. बालसुलभ शब्दांची निवड करून सर्व बालकवितांचा चित्तवेधक शेवट हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. प्रौढांसाठी प्रौढ शब्दात कविता करणे सोपे आहे. पण बालकांसाठी करावयाच्या रचनेत त्या मर्यादा सांभाळणे अवघड आहे. मात्र कवी पुराणिक यांचा या बाबतीत हातखंडा आहे.कवी : प्र.अ.पुराणिक, प्रकाशक : प्रसाद प्रभाकर पुराणिक, पृष्ठे : ३२, मूल्य : ४० रुपये.