पाचोरा येथे 80 वर्षापूर्वीची जीर्ण इमारत कोसळली
By admin | Updated: July 15, 2017 13:12 IST
सुदैवाने आजूबाजूला कोणीही नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला
पाचोरा येथे 80 वर्षापूर्वीची जीर्ण इमारत कोसळली
ऑनलाईन लोकमतपाचोरा, जि. जळगाव, दि. 15 - शहरातील 80 वर्षापूर्वीची दोन मजली जीर्ण इमारत शनिवारी पहाटे वाजेच्या सुमारास कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही. शहरातील बा.रु. निकुंभ सहकारी पतसंस्था या 80 वर्षापूर्वीच्या दोन मजली इमारतीमध्ये सुरू आहे. शनिवारी पहाटे ही इमारत अचानक कोसळली. सुदैवाने आजूबाजूला कोणीही नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवाय दररोज येथे कर्मचारी येतात. दिवसा ही घटना घडली असती तर मोठे संकट ओढावले असते, अशा भावना व्यक्त केल्या जात आहे.