शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात 108 ग्रा.पं.साठी नोव्हेंबरमध्ये मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:02 IST

जिल्हा प्रशासनातर्फे तयारी सुरू : थेट सरपंच निवडीमुळे राजकीय हालचाली गतिमान

ठळक मुद्देशिंदखेडा न.पं.साठी मतदारांची यादी अपडेट सुरू  सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक कार्यक्रम 1 सप्टेंबरला होणार अंतिम मतदार यादी

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 31 - जिल्ह्यातील 108 ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबर 2017 मध्ये संपणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या ग्रा.पं. निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने ग्रामीण भागात  राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तसेच इच्छुक उमेदवार आतापासूनच बेरजेचे गणित जुळवताना दिसत आहेत. धुळे जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये जिल्ह्यातील 83, तर डिसेंबर महिन्यात 25 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. धुळे तालुक्यातील सर्वाधिक 35 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 1 सप्टेंबरला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध दरम्यान, जिल्ह्यातील सर्व 108 ग्रामपंचायतींची मतदारांची यादी अपडेट करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांना 31 ऑगस्टर्पयत मतदार यादींवर हरकती घेण्यासाठी गुरुवारी दुपार्पयत अंतिम मुदत देण्यात आली असून, आतार्पयत एकही हरकत प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदार यादींवर हरकत प्राप्त न झाल्यास 1 सप्टेंबरला ग्रामपंचायतनिहाय मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आली आहे.जिल्ह्यातील 25  ग्रामपंचायतींची मुदत जरी डिसेंबर महिन्यात संपत असली तरी त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या नोव्हेंबर महिन्यातच घ्याव्यात, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 108 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया घेण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, तेथील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेने दिली आहे.शिंदखेडा नगरपंचायतसाठी मतदान प्रक्रिया डिसेंबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून मतदारांच्या याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीतील दुबार नावांचा शोध घेऊन दुबार नावांची वगळणीही केली जात आहे.