शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काका-पुतण्यात रंगला कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 13:55 IST

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरुन पेटला वाद : राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा

ठळक मुद्दे गर्वाची भाषा करण्यापेक्षा लोकांची कामे करा गिरीश महाजन यांनी 711 कोटींचे बलून बंधारे व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले पारोळ्यातून  महाजन यांना उभे रहाण्याची गरज नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यांवरून पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील व नगराध्यक्ष करण पवार या काका-पुतण्यांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. आम्ही कुणाच्या लाटेवर नाही तर कर्तृत्वावर निवडून आलो असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी म्हटले आहे तर काकासाहेब पारोळ्यातील आपली व पक्षाची पत ओळखा व नंतर गिरीश महाजन यांच्या विरूद्ध बोला असा टोला पवार यांनी डॉ.पाटील यांना मारला आहे. 

गर्वाची भाषा करण्यापेक्षा लोकांची कामे करा - डॉ.पाटीलपक्षवाढीसाठी अन्य पक्षांवर जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन  यांनी टीका करणे ठिक मात्र इतर पक्षांना संपविण्याची भाषा ही गर्वाची आहे. आम्ही कोणत्याही लाटेवर विजयी झालो नाही तर कर्तृत्वावर  निवडून आलो आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी समाचार  घेतला आहे. ते म्हणाले, अडीच वर्षात यांचे कर्तृत्व ते काय? गिरीश महाजन यांनी काय बोंब पाडली.  माङया घरातील एका पोराला माङयाविरुद्ध बोलायला लावता हा केविलवाणा प्रकार आहे. आम्हाला संपविण्याची भाषा करत असाल तर पारोळ्यात येऊन निवडणूक लढवावी. गर्वाची भाषा करण्यापेक्षा लोकांची कामे करा, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून पदाला न्याय द्या असे आव्हान डॉ. पाटील यांनी दिले आहे. 

पारोळ्यातून लढायला आम्हीच कार्यकर्ते पुरे आहोत-  पवारराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे काका डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात बिनबुडाची टीका करण्यापेक्षा पारोळा शहरातील आपली व जिल्ह्यात पक्ष काय आहे हे तपासून पहावे असा टोला पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी लगावला आहे.  गिरीश महाजन यांनी 711 कोटींचे बलून बंधारे व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. आपणही राज्यमंत्री होता त्यावेळी काय केले? महाजन यांनी जळगाव व नाशिकमध्ये जि.प.त यश मिळवून दाखविले. आपण मात्र पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवू शकले नाही. पारोळ्यातून  महाजन यांना उभे रहाण्याची गरज नाही आम्ही त्यांचे कार्यकर्तेच पुरे आहोत.