शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाने पाजले प}ीला फिनाईल

By admin | Updated: January 25, 2017 00:56 IST

खुनाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल : तीन लाखासाठी कुटुंबाकडून विवाहितेचा छळ

जळगाव : प्लॉट घेण्यासाठी तीन लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने पोलिसाने प}ीला फिनाईल पाजून ठार मारण्याचा प्रय} केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती रवींद्र श्रावण कापडणे (रा.शिव कॉलनी, जळगाव) याच्यासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांवर सोमवारी रात्री रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प}ी भाग्यश्री जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.पोलीस शीघ्र कृती दलातया प्रकरणातील रवींद्र हा पोलीस दलात कार्यरत असून पोलीस मुख्यालयात शिघ्र कृती दलात(क्युआरटी) त्याची डय़ुटी आहे. सांगवी, ता.पारोळा येथील भाग्यश्री व रवींद्र या दोघांचा विवाह 30 एप्रिल 2016 रोजी जळगाव शहरात झाला होता. विवाहाच्यावेळी पतीला 1 लाख रुपये रोख, साखरपुडय़ासाठी 50 हजाराचा व विवाहासाठी 50 हजाराचा खर्च माहेरच्या लोकांनी केला होता. माहेरच्या लोकांनी 3 रुपये शेकडा दराने व्याजाने 2 लाख रुपये सावकाराकडून कर्ज काढून मोठय़ा धूमधडाक्यात लगA केले होते. रवींद्रला लगAासाठी दहा हजार रुपयांचा सुट घेवून देण्यात आला होता, अशी माहिती भाग्यश्री यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दिली.मोक्षदा पाटील यांनी दिली समजभाग्यश्री हिला पती व सासरच्यांकडून त्रास वाढल्याने माहेरच्या लोकांनी पोलिसात तक्रार केली, मात्र तेव्हा दोघांना समजावण्यात आले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे हे प्रकरण गेले. त्यांनीही रवींद्रला समज दिली होती. त्यानंतर त्याने नमते घेतले होते, परंतु काही दिवसातच पुन्हा छळ सुरु झाला. भावालाही रुग्णालयात मारहाणभाग्यश्री हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा रवींद्र व त्याच्यासोबत असलेल्या पाच ते सहा जणांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप भाग्यश्रीचा भाऊ ज्ञानेश्वर शिवाजी रामोशी (वय 25) याने केला आहे. यापूर्वीही त्याने शिव कॉलनीत मारहाण केली होती. या वादामुळे कुटुंबातील सदस्यही भितीमध्ये आहेत. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक                  सचिन सांगळे यांनीही रामानंद नगर पोलीस स्टेशनला भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली.रात्री जबाब घेतल्यानंतर पतीसह सासु, सासरे, जेठ व नणंद या पाच जणांविरुध्द कलम 307 (जीवे ठार मारण्याचा प्रयत्न), 498 (अ) (हुंडय़ासाठी छळ करणे) , 323 (इजा होईल या उद्देशाने मारहाण करणे) ,504 ,506 (जीवे ठार मारण्याची धमकी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली. या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता राजपूत या करीत आहे. त्यांनी या प्रकरणात प्राथमिक माहिती घेत जबाब नोंदविल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून पैसे व अन्य कारणावरुन भाग्यश्री व रवींद्र या दोघांमध्ये वाद सुरु होता. सोमवारी हा वाद                     टोकाला गेला. नणंद कविता वगळता पतीसह सर्वानी भाग्यश्रीला दुपारी दोन वाजता मारहाण केली. त्यात तिच्या हातातील बांगडय़ा फुटल्या. नंतर रवींद्रने एका बाटलीत आणलेले फिनाईल भाग्यश्रीच्या तोंडात जबरदस्तीने टाकले. या प्रकारानंतर घाबरलेल्या भाग्यश्रीने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. लगAानंतर पंधरा दिवसात त्रास़़़ लगA झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पती रवींद्र कापडणे (पती),श्रावण शहादू कापडणे (सासरे), विमलबाई श्रावण कापडणे (सासु), हरीष श्रावण कापडणे (जेठ) सर्व रा.शिव कॉलनी, जळगाव व कविता सिध्दार्थ शिंदे (नणंद) रा.नेपानगर, मध्यप्रदेश या सर्वानी भाग्यश्रीकडे प्लॉट घेण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली. लगAाच्या वेळी अशी कोणतीच बोलणी झालेली नसताना पैसे का द्यायचे तसेच लगAासाठीच माहेरच्यांनी व्याजाने पैसे काढले, त्यामुळे आता ही रक्कम देणे शक्य नसल्याचे भाग्यश्रीने सांगितले असता तिला त्रास द्यायला सुरुवात केली. यावेळी वेळोवेळी मारहाणही झाली.पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयितांपैकी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला आहे.लवकरच अटकेची प्रक्रिया केली जाईल.-प्रवीण वाडिले, पोलीस निरीक्षक