शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

पोलीस पाटीलच 'कारचोर'

By admin | Updated: July 29, 2014 13:40 IST

ठाणे, मुंबई, भिवंडी, नाशिक या शहरांमधील चोरीच्या चारचाकी वाहनांची जिल्ह्यातील विविध गावांमध्ये एक ते दोन लाखांमध्ये विक्री करणार्‍या दोन संशयितांना सोमवारी अटक करण्यात आली.

जळगाव : ठाणे, मुंबई, भिवंडी, नाशिक या शहरांमधील चोरीच्या चारचाकी वाहनांची जिल्ह्यातील विविध गावांमध्ये एक ते दोन लाखांमध्ये विक्री करणार्‍या दोन संशयितांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यात मेहरगाव, ता.अमळनेरचे पोलीस पाटील किशोर पिरन पाटील व त्याच्या चुलत भावाचा समावेश आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या कारवाईत दोघांकडून १५ चारचाकी वाहने जप्त केली आहेत. पोलिसांनी या टोळीतील मुंबई येथील म्होरक्याचा शोध सुरू केला आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी बापूराव भोसले यांना किशोर पिरन पाटील हा चाळीसगावकडून भडगावकडे एक चोरीची चारचाकी नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी उपनिरीक्षक गिरधर निकम  व सहकार्‍यांचे पथक तयार करीत कारवाईचे आदेश दिले. या पथकाने तांदलवाडी फाट्याजवळ सापळा लावून किशोर पाटील व त्याचा चुलत भाऊ भूषण भीमराव पाटील यांना ताब्यात घेतले. दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर ठाणे, मुंबई, भिवंडी, नाशिक येथील चोरीच्या वाहनांची अमळनेर, पारोळा, धरणगाव तालुक्यात विक्री केल्याची कबुली दिली. या पथकाने संध्याकाळपर्यंत विविध कंपन्यांच्या १५ चारचाकी जप्त केलेल्या आहेत.
 
ही वाहने ताब्यात 
■ नंबर एमएच १५ डीएम ८७४९, एमएच १५ डीएम ८५४९, एमएच 0४ एफजे ३४७२, एमएच 0४ डीजे २७९८, एमएच १५ डीएस ६४0३, एमएच 0४ डीएम ८११४, एमएच २८ व्ही २७८३, एमएच 0३ डीजे ७९३, एमएच 0४ एफएक्स ३७५८, एमएच 0४ ईडब्ल्यू ५६२३, एमएच 0४ ईडी २४३३, एमएच 0६ एएफ ३८0९ आणि एमएच १५ डीएम ३४0६ असे आहेत.