शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रात्री ११ वाजता लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:15 IST

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.

जळगाव : पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात गंभीर कलम लावण्यासाठी फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या संभाजी श्यामराव पाटील (रा. जे.डी.सी.सी.बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल भादंवि कलम ३०७च्या गुन्ह्यातील फिर्यादी असून त्यांना संभाजी पाटील यांनी मी तुमच्या गुन्ह्यात गंभीर स्वरूपाची कलमे लावलेली आहे. तसेच सदर केसमध्ये भक्कम पुरावा तयार करून केस मजबूत करतो, असे सांगून त्या मोबदल्यात तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.त्यानंतर जळगावातील २० वर्षीय तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ३ मार्च रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन समोरच संभाजी पाटील यांना १० हजाराची लाच स्वीकारताना लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आले.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक रवींद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहिरे, सुनील पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, पो.कॉ. प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर यांनी केली. ज्या पोलीस ठाण्यात संभाजी पाटील कार्यरत आहेत, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.