शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलीस अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:30 IST

चोपडा : अंकलेश्वर बुºहाणपूर महामार्गावर उभे राहून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची लुबाडणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला ७ जुलै रोजी रंगेहात ...

चोपडा : अंकलेश्वर बुºहाणपूर महामार्गावर उभे राहून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची लुबाडणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला ७ जुलै रोजी रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रस्त्यावर चहार्डी फट्याजवळ एक तोतया पोलीस येणाºया जाणाºया दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे वाहन परवाना व कागदपत्रांची मागणी करीत होता. ही माहिती गलवाडे, ता.चोपडा येथील होमगार्ड संदीप लक्ष्मण सोनवणे यांनी मोबाईलवरून पोलीस नाईक प्रदीप राजपूत यांना दिली. त्यानंतर पोलिस नाईक प्रदीप राजपूत व ज्ञानेश्वर जवागे बातमीची शहानिशा करण्यासाठी चहार्डी फाट्याजवळ पोहचले. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती चारचाकी गाडी थांबवून चालक सागर साहेबराव गजरे, रा.चहार्डी त्याच्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी करताना दिसून आला. त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने भिकन पंडित शर्मा, रा. तलाव गल्ली, पारोळा असे त्याचे नाव सांगितले. तत्काळ पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्या खिशात आधारकार्ड, लायसन्स, होमगार्ड ड्रेसवरील फोटोचे ओळखपत्र तसेच ४५० रुपये रोख आढळून आले. यावेळी त्याच्याकडे असलेली दुचाकी (क्रमांक एमएच-१९-सीके-५६९२) पोलिसांनी जप्त केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात भाग-५ गुरनं.१०६/२०१९ भादंवि कलम ४१९, १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मधुकर पवार करीत आहेत.