शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रसलपूर येथील गुरांची अवैध कत्तल व मांस वाहतूक करणाऱ्या सहा आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:15 IST

 अवैध मांस वाहतूक करणाऱ्या वाहनास जाळल्याप्रकरणी ११ आरोपींची जामिनावर सुटका

रावेर : तालुक्यातील रसलपूर येथे गुरांची अवैध कत्तल व मांस वाहतूक करणाºया सहा आरोपींना पोलीस कोठडी तर अवैध मांस वाहतूक करणाºया वाहनास जाळल्याप्रकरणी ११ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.रसलपूर येथील शेख जमील शेख अय्युब, शेख कलाम शेख नजीर, शेख शकील शेख नुरा, शेख अफसर शेख हसन, शेख हुसेन शेख हसन हे अवैध कत्तल केलेले आठ क्विंटल मांस घेऊन बºहाणपूर येथे एमपी-६८-पी-०१३७ या वाहनाने जात होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील गतिरोधकावरून दणका बसल्याने रिक्षास्टॉपपासून ते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पुढे शेख अजिज शेख शिराजोद्दीन यांच्या घरापर्यंत गोमांसाच्या पाच ते सहा थैल्या निसटून पडल्या. ही घटना गुुरुवारी सकाळी घडली होती. संतप्त जमावाने सदर गाडीचा चालक शे वसीम शे इस्माईल रा मदिना कॉलनी, रावेर यास बदडले.ा तो जमावाच्या गोंधळाचा फायदा घेऊन पसार झाला होता. म्हणून संतप्त जमावाने अवैधरीत्या गोमांस वाहतूक करणाºया वाहनास आग लावून पेटवून दिले होते.पोलिसान्ांी घरोघरी शोध घेवून आरोपींचे अटकसत्र राबवले. पसार झालेला वाहनचालक आरोपी शेख वसीम शेख इस्माईल (वय ३०) रा.मदिना कॉलनी, रावेर व गाडीमालक शेख शकुर उर्फ कालू शेख हुसेन (वय ३२) रा.बंडू चौक, रावेर यांना रावेर पोलिसात दाखल गुन्ह्यात गुरूवारी रात्रीच अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना पोलिसांनी थर्ड डिग्री दाखवताच त्यांनी रसलपूर येथील बेकायदेशीररित्या गोवंश हत्या करून मांसविक्री करणाºया शेख जमील शेख अय्युब (वय २८), शेख शकील शेख नुरा (वय ४१), शेख अफसर शेख हसन (वय २८), शेख हुसेन शेख हसन यांचेकडून सदरील मांस खरेदी केल्याची व बºहाणपूर येथे लग्नासाठी एका एजंटला विकल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने रसलपूर येथील बेकायदेशीर कत्तलखाना चालवून मांसविक्री करणाºया शेख जमील शेख अय्युब (वय २८), शेख शकील शेख नुरा (वय ४१), शेख अफसर शेख हसन (वय २८), शेख हुसेन शेख हसन (सर्व रा.रसलपूर) यांना रावेर पोलिसांनी अटक केलीे.दरम्यान, वाहनास पेटवल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दुसºया गुन्ह्यातील आरोपी बक्षीपूर येथील ग्रा.पं.सदस्य स्वप्नील मनोहर पाटील व प्रल्हाद संतोष महाजन वगैरे ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना रावेर फौजदारी व दिवाणी न्यायालयात शनिवारी हजर केले असता पहिल्या गुन्ह्यातील पाच आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर दुसºया गुन्ह्यातील ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. पहिल्या गुन्ह्यात तपासाधिकारी म्हणून फौजदार नाझीम शेख यांनी तर दुसºया गुन्ह्यात तपासाधिकारी म्हणून फौजदार अमृत पाटील यांनी काम पाहिले.