शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’, दोघे ‘तडीपार’ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:13 IST

गुन्हेगार प्रवृत्तीचा समूळ नायनाट व्हावा, याकरिता आठवड्यातून एक दिवस ‘कोम्बिंग डे’ राहणार आहे.

 भुसावळ : शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगार प्रवृत्तीचा समूळ नायनाट व्हावा, याकरिता आठवड्यातून एक दिवस ‘कोम्बिंग डे’ राहणार असून, यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीसीटर पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. ६ मे रोजी रात्री बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन हद्दपार आरोपींना अटक करण्यात आली. हेमंत उर्फ (सोन्या) जगदीश पैठणकर आणि चेतन उर्फ (गुल्या) पोपट खडसे अशी आरोपींची नाव असून, पाच गुन्हेगारांना समन्स बजावण्यात आले आहे.कोरोना लॉकडाऊन काळात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारी वृत्तीचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रात्री दुकानफोडी होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनातर्फे ‘व्यापारी पोलीस मित्र’ या संकल्पनेतून पोलिसांसोबत व्यापारीवर्ग बाजारपेठ हद्दीत गस्त घालत आहे. याशिवाय आपापल्या परिसरामध्ये पोलीस प्रशासनासह जागरुक नागरिक चोरी, घरफोडी होऊ नये, याकरिता रात्री गस्त घालताना दिसून येत आहेत.शहर व तालुक्यातील गुन्हेगारीचा संपूर्ण नायनाट व्हावा, याकरिता पोलीस प्रशासन आठवड्यातून एक दिवस ‘कोम्बिंग डे’ राबवणार आहे. यात हद्दपार आरोपी, हिस्ट्रीसीटर, गुन्हेगारी वृत्ती, नशेच्या आहारी गेलेली तरुण मुलं यांची चौकशी केली जाणार आहे. याचाच भाग म्हणून शहरात शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यात हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

हद्दपार आरोपी जाळ्यात‘कोम्बिंग ऑपरेशन डे’ला पेट्रोलिंग करत असताना हद्दपार आरोपी हेमंत उर्फ (सोन्या) जगदीश पैठणकर (२७, रा. भिरूड हॉस्पिटलजवळ) व चेतन उर्फ (गुल्या) पोपट खडसे (२८, रा. हनुमान नगर, भुसावळ) हे दोन्ही आरोपी एक वर्षाकरिता हद्दपार आहेत. मात्र, असे असतानाही ते हद्दपारीचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या शहरात वावरताना आढळले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईवाल्मीक नगरातील रामदेवबाबा मंदिराजवळ संशयित आरोपी भीमराव जानू इंगळे (७५) हा १५ लीटर गावठी हातभट्टीची दारू २० लीटरच्या कॅनमधून विक्री करत होता. त्याच्याजवळील गावठी दारू ताब्यात घेण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नॉन बेलेबल आरोपी ताब्यातबाजारपेठ हद्दीतील नॉन बेलेबल आरोपी शेख मुजम्मिल शेख शब्बीर (३०, रा. ग्रीन पार्क, भुसावळ) हा शहरात फिरत असताना त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.पाच समन्सची बजावणीकोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाच गुन्हेगारांना समन्सची बजावणी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. यापुढे गुन्हेगारीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोम्बिंग डे राबविणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, हेडकाॅन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, कृष्णा देशमुख, नेव्हिल बाटली, रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरडकर, चंद्रकांत बोदडे, समाधान पाटील, महेश चौधरी, यासीन पिंजारी, योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बिऱ्हाडे, कर्तारसिंग परदेशी, सचिन चौधरी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ