धुळे : तालुक्यातील शिरूड-धामणगाव शिवारात बनावट देशी मद्यनिर्मिती अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या तालुका पोलिसांच्या पथकातील चार जण रसायनाच्या स्फोटात गंभीररित्या भाजले. ही दुर्घटना बुधवारी दुपारी घडली. भाजलेल्या कर्मचा:यांमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह एक हेडकॉन्स्टेबल व दोन पोलीस कर्मचा:यांचा समावेश आहे. त्यापैकी हेडकॉन्स्टेबल आनंदा माळी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खब:याकडून तालुका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक नीलेश रमेशसिंह मोरे (29), हेडकॉन्स्टेबल आनंदा दगडू माळी (56), पी.जी. मोहने (54), पोलीस नाईक राजू रामा वसावे (32) व जितेंद्र नारायण सोनार (34) यांचे पथक कारवाईसाठी गेले होते. हे सर्व गंभीरररित्या भाजले. आनंदा माळी हे 100 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना त्वरित नाशिक येथे तर इतर तिघांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना प्रभारी पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केल्या. नदीकिनारी अड्डय़ावर पोलीस पोहचण्यापूर्वीच बनावट मद्यनिर्मिती करणारे तेथून पसार झाले. पोलीस मुद्देमाल नष्ट करित असतानाच हेडकॉन्स्टेबल आनंदा माळी यांनी रसायनाच्या ड्रमचे झाकण उघडताच मोठा स्फोट झाला. माळी यांच्या अंगावरील कपडय़ांनी पेट घेतला. गंभीररित्या भाजल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर पंचमान्याच्या नोंदी घेणारे पी.जी. मोहने व वसावे यांनी जखमींना पोलीस वाहनात बसवले. भाजलेले असतानाही वसावे यांनी स्वत: पाच ते सहा किलोमीटर वाहन चालवत आणले. तेथून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने सर्वाना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांच्यासह इतर कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. काही कालावधीनंतर प्र.पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हेदेखील रुग्णालयात आले. त्यांनी जखमी कर्मचा:यांची विचारपूस केली. दुसरे पथक घटनास्थळी रवाना कारवाई सुरू असतानाच दुर्घटना घडल्याने बनावट मद्यसाठा, कच्चा माल, रसायन, स्पिरीट व इतर साहित्य तेथेच सोडून पथक परतले होते. त्यामुळे मद्यसाठा जप्त करून अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी धुळ्याहून दुसरे पथक शिरूडकडे गेले. दुसरे पथक घटनास्थळी रवाना कारवाई सुरू असतानाच दुर्घटना घडल्याने बनावट मद्यसाठा, कच्चा माल, रसायन, स्पिरीट व इतर साहित्य तेथेच सोडून पथक परतले होते. त्यामुळे मद्यसाठा जप्त करून अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी धुळ्याहून दुसरे पथक शिरूडकडे गेले. प्र.पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह धुळे ग्रामीण उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश सोनवणे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी धुळ्याहून गेलेल्या दुस:या पथकातील काही कर्मचारीही होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, मद्यमाफियांनी पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच अड्डय़ावरून इतर साहित्य, रसायन, मद्यसाठा दुसरीकडे हलवला होता. तर काही साहित्याची नासधूस व जाळपोळ केली होती. सायंकाळी केवळ दोन प्लॅस्टिकचे मोठे ड्रम त्या ठिकाणी आढळून आले. जळालेली वर्दी, कंबरपट्टा.. घटनास्थळापासून 50 ते 60 फूट अंतरावर आनंदा माळी यांच्या अंगावरील शासकीय वर्दी, कंबरपट्टय़ाचे जळालेले काही अवशेष आढळले. वर्दीचा खिसा व त्यातील पाकिट, कंबरपट्टय़ाचा लॉक, कोळसा झालेला भ्रमणध्वनी तेथून जप्त करण्यात आले. सायंकाळी पंचनामा सुरू असताना शिरुडचे माजी उपसरपंच विलास पाटील यांच्यासह काही ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्याकडूनही पोलिसांनी माहिती जाणून घेतली.
रसायनाच्या स्फोटात पोलीस भाजले
By admin | Updated: December 31, 2015 00:42 IST