शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात पोलीस बॉईज व शनी पेठच्या तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:23 IST

पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीसस्टेशनच्याकार्यक्षेत्रात राहणाºया तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. हातात काठ्या व लोखंडी सळई असल्याने सर्वत्र पळापळ झाली होती. पोलीस मुख्यालयासमोरच तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून रस्त्याने जाणाºया पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व तरुणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयासमोरील घटना  लोखंडी सळईचा वापर ९ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखलपोलीस मैदानावर धक्का लागल्याचे कारण

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २५  पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीसस्टेशनच्याकार्यक्षेत्रात राहणाºया तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. हातात काठ्या व लोखंडी सळई असल्याने सर्वत्र पळापळ झाली होती. पोलीस मुख्यालयासमोरच तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून रस्त्याने जाणाºया पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व तरुणांना ताब्यात घेतले. दरम्यान, ९ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हाणामारी, दंगल व सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात चंद्रशेखर सदाशिव कोळी (वय २३), राहूल रतिलाल सपकाळे, पंकज हरी तायडे (सर्व रा.शनी पेठ परिसर)व सुदर्शन भिका कोळी रा.पाळधी, ता.धरणगाव तर दुस-या गटातील पोलीस बॉईज निलेश सोपान पाटील (रा.शामराव नगर, आशाबाबा नगर, जळगाव), मोंटू अभिमन्यू इंगळे (रा. पोलीस लाईन दक्षता नगर, जळगाव), राजेश नथ्थू शिंदे (रा.आसोदा, ता.जळगाव), पुष्पक मुकेश पाटील (रा.पोलीस लाईन, दक्षता नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.

पोलीस मैदानावर धक्का लागल्याचे कारणपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटातील तरुण पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी जातात. तेथे पळताना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन्ही गटात धूसफूस होती, ती आज थेट हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. दरम्यान, पोलीस लाईनमधील तरुणांमध्ये यापूर्वी तीन वेळा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. निव्वळ पोलिसांची मुले आहेत म्हणून पोलिसांनीही कारवाई करणे टाळले होते. रविवारी तर प्रकरण हाताबाहेरच गेले.स्वत: पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासमोर हाणामाºया झाल्या. नियंत्रण कक्षातून क्युआरटी पथकाला पाचारण करुन या तरुणांना ताब्यात घेण्यात आले.