शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कानळदा येथे पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:31 IST

प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता.जळगाव येथे घडली.

ठळक मुद्दे तरुणाच्या मृत्यूप्रकरणात न्यायासाठी काढला विनापरवानगी मोर्चावृध्द झोपले पोलीस वाहनासमोरगावातच अडविला मोर्चा
आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ९ : तालुक्यातील कानळदा येथील प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, पोलिसांनीच मयत तरुणाचे आजोबा रामचंद्र देवचंद सपकाळे यांच्या डोक्यात काठी टाकली असा आरोपही गावकºयांनी केला आहे. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.प्रशांत सपकाळे या तरुणाचा मृतदेह २ आॅगस्ट रोजी पहाटे गावाबाहेर एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला होता. त्यामुळे प्रशांत याला कोणी तरी मारुन झाडावर लटकवून दिल्याचा आरोप त्याचे आजोबा रामचंद्र सपकाळे यांनी केला होता. या प्रकरणात तीन महिने उलटले तरी दोषींना अटक झाली नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गावातच अडविला मोर्चासकाळी दहा वाजता गावातील ५० महिला व पुरुष बॅनर घेऊन मुख्य चौकात जमले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी कुवारखेडा येथे जाणाºया पोलिसांना रस्त्यात गर्दी जमलेली दिसली. त्यांनी मोर्चेकरांना विरोध केला असता पोलीस व मोर्चेकरांमध्ये वाद झाला. परवानगी नसल्याने मोर्चा जागेवरच अडविण्यात आला.वृध्द झोपले पोलीस वाहनासमोरपोलीस व मोर्चेकºयात वाद होत असताना मयत प्रशांत याचे आजोबा रामचंद्र सपकाळे हे पोलीस वाहनासमोर झोपले. हवालदार राजेंद्र बोरसे यांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडाने स्वत:चे डोके फोडून घेतले. यात प्रचंड रक्तस्त्राव व्हायला लागल्याने सहायक निरीक्षक सचिन बागुल व उपनिरीक्षक बी.डी.पाटील यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही अंगावर जमाव धावून आला. त्यांच्याशी धक्काबुक्ती झाली. यावेळी सपकाळे यांनी रक्ताचे हात पोलिसांच्या कपड्यावर मारले.