शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कविता करतात संस्कारांची पेरणी- प्रा.वा.ना. आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:50 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले.

ठळक मुद्देकुºहा काकोडा येथे मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटनकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झाला कार्यक्रम‘आई मला जन्म घेऊ दे...’ या कवितेची फ्रेम महाविद्यालयाला दिली भेट

मुक्ताईनगर, जि.जळगाव : माणसाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात कविता नानाविध रुपाने, प्रसंगाने भेटते. कवितेतून संस्कार मिळतात. ती ज्याला कळली तो धन्य समजावा. समाजहितैषी साहित्यधन जपून त्याचा प्रचार, प्रसार करणे हे आयुष्याचं संचित समजायला हवे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक तथा धरणगाव येथील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.वा.ना. आंधळे यांनी व्यक्त केली.मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यात प्रा.आंधळे बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके होते.विचारमंचावर संस्थाध्यक्ष प्रमोद शिवलकर, पुरणमल चौधरी, भालचंद्र कुलकर्णी, दामू सुरंगे, प्रभाकर सुशीर, वासुदेव पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.आर. वराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश पाटील यांनी केले.‘कविता आई होते तेव्हा’ हा विषय घेऊन कवी प्रा.आंधळे यांनी माणसाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कविता कशी भेटत जाते? हे विविध प्रकारच्या कविता सादर करून समजावून सांगितले. ‘धरू नका ही बरे फुलावर उडती फुलपाखरे’ ही कविता लयबद्धपणे सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवले. उत्तरोत्तर रंगलेल्या या कार्यक्रमात त्यांनी किमान तीन पिढ्यांनी अभ्यासक्रमात अभ्यासलेल्या कविता प्रातिनिधिक स्वरुपात तोंडपाठ साभिनय सादर केल्या. त्यानंतर त्यांनी स्वलिखीत ‘आई मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग मलादेखील पाहू दे, नको मारू आई मला जन्म घेऊ दे’ या कवितेची फ्रेम महाविद्यालयाला भेट दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयMuktainagarमुक्ताईनगर