शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शोषितांच्या भावना कवितांमधून व्यक्त करणारा काव्यसंग्रह : उन्हाळ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:16 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी ज्येष्ठ कवी निंबाजीराव बागुल यांच्या ‘उन्हाळ झळा’ या काव्यसंग्रहाचा थोडक्यात करून दिलेला परिचय.

नंदुरबार स्थित ज्येष्ठ कवी निंबाजीराव हरिभाऊ बागुल यांचा ‘उन्हाळ झळा’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. समाजातील शोषित, कष्टाळू, श्रमिक वर्गाला ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. या काव्यसंग्रहात ५३ कवितांचा समावेश असून, निखळ सामाजिक प्रबोधनाला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण व शहरी वाड्या-वस्त्यातील सामान्य माणसांची व्यथा, वेदना बोलकी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रातील प्रस्थापितांचा सर्व स्तरावरील शोषणाचा लेखाजोखा हा त्यांच्या कवितांचा विषय आणि आशय आहे. असे असले तरी कुणाच्या वैयक्तिक वा सांघिक भावनेवर कवितेतून त्यांनी प्रहार केलेला नाही. व्यापक सामाजिक हितसंबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. तथापि, अमानवी विघातक प्रवृत्तीबद्दलचा सात्विक रोष व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे. याबाबत ‘शापित गाव’ या कवितेत कवी निंबाजीराव बागुल लिहितात,हासूनी छेडण्याचा हा डाव माणसांचा,पाठीत वार करण्याचा सराव माणसांचा.फसवे मुखवटे हे नेमके गर्दीत झाकलेले, व्यथेवर मीठ, चोळण्याचा बनाव माणसांचा.अशा काही कविता वास्तवतेचे भान जागवतात.आपल्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ससेहोलपट, दुष्काळाने ग्रामीण समाजाचा मोडलेला कणा, शेतकºयांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाºया आत्महत्या, स्त्रियांचे सामाजिक शोषण, न संपणारा बेरोजगारीचा प्रश्न या काव्यसंग्रहातून मांडण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.कवी : निंबाजीराव बागुल , प्रकाशक : कुसुमाग्रज प्रकाशन, पृष्ठे ७६, मूल्य ८० रुपये.