येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून, ९९ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्थानिक चेअरमन प्रा. भागवत महालपुरे हे होते.
याप्रसंगी सरपंच भरत राठोड, विकासो चेअरमन बालू बोरसे, माजी मुख्याध्यापक देवीदास वाघ, शालेय समिती सदस्य मोहन बच्छे, माजी सरपंच डॉ. जे. एस. परदेशी, भातखंडे सरपंच व शेतकी संघाचे संचालक दिनेश पाटील उपस्थित होते. यावेळी प्रथम आलेल्या सानिया तडवी या विद्यार्थिनीस डॉ. जे. एस. परदेशी यांनी कौतुकाची थाप देऊन ५०० रुपये बक्षीस दिले.
द्वितीय क्रमांकाने आलेला तनवीर तडवी तसेच सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रा. महालपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील यांनी तर, आभार प्राथमिकचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी मानले.