प.न. लुंकड कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. शाळेतील रसिका ढेपे व रिद्धी पाटील यांनी शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच देवयानी नाईक (९९ टक्के) मिळवून द्वितीय तर तृतीय वैदेही बंगाली (९८.८० टक्के व चतुर्थ वैष्णवी पाटील (९९.४० टक्के), पाचवी नेहा चंदेले (९६.८० टक्के) ठरली आहे. या विद्यार्थिनींचे मंडळाचे कार्याध्यक्ष सुशील अत्रे, अभिजित देशपांडे, प्रेमचंद ओसवाल, शरदचंद्र छापेकर, सुरेंद्र लुंकड, कवरलाल संघवी, पद्मजा अत्रे, भारती इसई, प्रतिभा देशकर, रेवती शेंदुर्णीकर, स्वाती नेवे आदींनी अभिनंदन केले आहे.
०००००००००००००००
शानभाग विद्यालय (फोटो)
ब.गो. शानभाग माध्यमिक विद्यालयात ९७.८० टक्के मिळवून सानिका जोशी ही शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक शार्दुल हिंगणे (९७.८० टक्के), तृतीय पल्लवी पाटील (९७.४० टक्के), चतुर्थ सारस पाटील (९७ टक्के) व पाचवा दीपक पवार (९६.८० टक्के) ठरला आहे. तसेच निवासी विभागातून नितीन ईश्वर कोळी (८९.६०%) हा प्रथम आला आहे. यावर्षी विद्यालयातून २११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते़ सरासरी निकालात ९० टक्के च्यापुढे एकूण २८ विद्यार्थ्यांनी बाजी मारली तर ८० टक्केच्या पुढे ६७ विद्यार्थी, ७० टक्केच्या पुढे ५७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्ष विनोद पाटील, मुख्याध्यापिका अंजली महाजन, जयंतराव टेंभरे, विभाग प्रमुख जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील आदींनी केले आहे.
०००००००००००००००
उज्ज्वल स्प्राऊटर इंटरनॅशल स्कूल (फोटो)
उज्ज्वल स्प्राऊटर इंटरनॅशल स्कूलचे २९ विद्यार्थी मोठ्या टक्केवारीने उत्तीर्ण झाले आहे. यातून एकूण २२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तसेच १ विद्यार्थी हा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. शाळेतून दीपिका घैसास १०० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय यश आगीवाल ९७.६० टक्के, तृतीय वैष्णवी पाटील ९७.२० टक्के, चतुर्थ प्रथम जाधव ९६.८० टक्के, पाचवी गुंजन अग्रवाल ९६ टक्के तर मानसी जांगीड ९३.२० टक्के गुण सहावी ठरली आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनघा गगडाणी, मुख्याध्यपिका मानसी गगडाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
०००००००००००००००
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल (पासपोर्ट फोटो)
प्राेग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल शाळेतील ९० टक्क्यांच्यावर १२ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. तर ६३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणी व १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे़ तसेच शाळेतून प्रथम नरेश माळी (९८ टक्के), द्वितीय सेजल पवार (९४.८० टक्के), तृतीय अनुराग पाटील (९४.६० टक्के), चतुर्थ ऐश्वर्या रॉय (९४ टक्के), पाचवी वैष्णवी पाटील (९२.६०) ठरली आहे. ज्ञानेश्वरी खाटीवाडा (९१.८० टक्के), रितेश खडसे (९१़४० टक्के), शुभेच्छा जडे (९१.४० टक्के), अथर्व देशमुख (९१.२० टक्के), कुणाल ब-हाटे (९१ टक्के), वैष्णवी देवरे (९०.२० टक्के) गुण मिळवून यश संपादन केले आह़. या विद्यार्थ्यांचे प्रेमचंद ओसवाल, मंगला दुनाखे, सचिन दुनाखे, श्रद्धा दुनाखे, विजया चौरे, सुषमा थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.
००००००००००००००००
इकरा शाहीन स्कूल
इकरा शाहिन उर्दू शाळेतील ४९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात तर ८० विद्यार्थी प्रथम श्रेणी व ३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे करिम सालार, एजाज मलिक, मोहम्मद ताहेर शेख, शेख गुलाब इस्हाक आदींनी अभिनंदन केले आहे. ९९.६० टक्के गुण मिळवून इरफान नाझ शेख याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय शेख अरिबा फातेमा मनझूर अहमद (९९.४० टक्के), तृतीय अलफिया फातेमा शेख (९८.४० टक्के), चतुर्थ शाह मोहम्मद आकीब आरिफ (९७.२० टक्के), पाचवा क्रमांक सैय्यद झुवा फातेमा अली अंजूम (९६.८० टक्के) यांनी पटकाविला.
०००००००००००००००
नंदिनीबाई विद्यालय (फोटो)
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून त्यात ९० टक्क्याच्यावर ३१ विद्यार्थिनींनी गुण मिळविले आहे. तर ८० टक्क्यांच्यावर १२३ विद्यार्थिनींनी गुण मिळविले आहे. विद्यालयातून ९८.४० टक्के मिळवून अनुष्का पाटील ही प्रथम आली आहे. द्वितीय हेमांग पाटील (९८.४० टक्के), तृतीय अनुष्का सराफ (९७.८० टक्के), चतुर्थ राधिका पाटील (९७.६० टक्के), पाचवी प्रेरणा पवार (९७.४० टक्के) गुण मिळवून ठरली आहे. या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, एन.एस. पाटील, मुख्याध्यापिका चारूलता पाटील, श्रीनिवास पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
०००००००००००००००
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (पासपोर्ट फोटो )
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे विशेष श्रेणीत ३६ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत २७ व द्वितीय श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, शाळेतून महेश भोरटक्के हा ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. द्वितीय भूमिका इंदाणी (९३ टक्के), तृतीय साक्षी चौधरी (९१.०४ टक्के), चतुर्थ चैताली बारी (९०.०६ टक्के) गुण मिळवून ठरली आहे. या विद्यार्थ्यांचा शनिवारी संस्थाध्यक्ष अरविंद लाठी, दिलीप लाठी, मुकुंद लाठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश चौधरी, एस.जी. पाटील, डी.पी. पाटील, एल.एस. पांडे, आर.आर. शिंपी आदींनी परिश्रम घेतले.
००००००००००
राज प्राथमिक विद्यालय
राज प्राथमिक- माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी पार पडला़ या विद्यार्थ्यांचा जयश्री महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नियमित विद्यार्थ्यांमध्ये प्रथम प्रतीक्षा पाटील (८९.४० टक्के), द्वितीय छकुली जाधव (८९ टक्के), तृतीय योगेश्वर होळकर (८८.४० टक्के) गुण मिळवून ठरली आहे.
०००००००००००
आर. आर. विद्यालय
आर.आर. विद्यालयातून तेजस्वीनी नारखेडे (९९.८० टक्के) गुण मिळवून प्रथम आली आहे. द्वितीय मिनल चौधरी (९८.८० टक्के), तृतीय धनश्री वानखेडे (९७.८० टक्के), चतुर्थ जयेश नाईक (९७ टक्के), पाचवा महेश पाटील (९६.८० टक्के) हा ठरला आहे.