शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदीवासी भागात रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 18:00 IST

प्रचंड गैरसोय

सावखेडा :   रावेर तालुक्यातील सातपुडा जंगलात असलेले आदिवासी गावे तिड्या अंधारमळी,मोहमांडली , निमड्या, गारखेडा हे रस्ते अतिशय खराब झाले असुन नागरिकांना दवाखाना व  शासकीय कामी  मोठे हाल सहन करीत या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.  तिड्या, मोहमांली, अंधारमळी, निमड्या, गारखेडा रस्त्याची दयनीय अवस्था संबधित अधिकारी, पदाधिकारी यांना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक डोळेझाक करीत असल्याचे  ग्रामस्थांकडुन बोलले जात आहे.या रस्त्यांची गेल्या तीन वर्षापासुन अतिशय दुरावस्था झाली असून हे रस्ते अपघातांना कारणीभुत ठरत आहेत. या रस्त्यांनी  प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. वाहनधारक, प्रवासी त्रस्त झाले असून  गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी दवाखान्यात जाताना या रस्त्यामुळे तर खूपच त्रास होतो. काही वेळा तर  रस्त्यातच बाळंतपण होते.  अशा वेळी रस्त्यात  नवजात शिशुला जन्म देतांना बाळ किंवा मातेला आपल जीव गमवावा लागला आहे.  यास जबाबदार कोण ? असा सवाल आदिवासी जनतेने उपस्थित केला आहे.  सातपुडा भाग हा जंगलमय परिसर असून येथे नेहमी काही ना काही घटना घडतच असतात. जंगलातील प्राण्यांपासुन देखील या परिसरातील जनतेला जीवाला धोका असतो. एकूणच खडतर जीवन जगत असताना आवश्यक कामासाठी जाताना रस्ताही धड नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही समस्या मांडली असता संबंधित विभागाच्या अधिकारी, पदाधिकारी यांचेकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.  अमाचा आदिवासी भाग असल्यामुळे दुर्लक्ष केले जात आहे, असे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले.  या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन  संबधित गावांच्या रस्त्यांची व पुलांची तत्काळ  दुरुस्ती करावी अशी रास्त  मागणी, तिड्या, अंधारमळी, मोहमांडी,निमड्या,गारखेडा गावाच्या नागरिकांनी  केली आहे.