शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीपात्रात ‘रात्रीस खेळ चाले’ वाळू चोरट्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:56 IST

वाळू उपसा करण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा सुरु असल्याचे  ‘लोकमत’ च्या चमुने गिरणा नदीपात्रातील काही स्थळांची पाहणी केली असता दिसून आले.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष गिरणा नदी पात्रात रात्री ९ ते सकाळी सहा दरम्यान ‘जत्रा’डंपर व ट्रॅक्टरव्दारे चोरटी वाहतूक

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.३-वाळू उपसा करण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा सुरु असल्याचे  ‘लोकमत’ च्या चमुने गिरणा नदीपात्रातील काही स्थळांची पाहणी केली असता दिसून आले. रात्री ९ ते सकाळी सहा दरम्यान आव्हाणे, आव्हाणी, फुपनगरी, खेडी व निमखेडी परिसरातील गिरणा नदीपात्रातून सर्रासपणे चोरटी वाळू वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले. महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. 

३० सप्टेंबरपासून राज्यातील सर्व वाळू ठेक्यांची मुदत संपल्यानंतर वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील फुपनगरी येथील वाळू ठेक्याचा लिलाव देण्यात आला होता. मात्र ठेक्याची मुदत संपल्यानंतरही या ठिकाणी सर्रासपणे वाळू उपसा सुरु  आहे. हेच चित्र बांभोरी ते फुपनगरी पर्यंतच्या गिरणा नदी पात्रात पहायला मिळत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू व्यावसायिकांकडून वाळूची चोरटी  वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलवर पाणी फेरले जात आहे. 

रात्री ९ वाजेपासून सुरु होते वाहतूक‘लोकमत’च्या चमुने रात्री ९ वाजेच्या दरम्यान कानळदा रोड परिसरात पाहणी केली असता. रात्री १० ते १०.४५ दरम्यान वाळूचे फुपनगरीकडून जळगावकडे चार डंपर व दोन ट्रॅक्टर भरून गेले. तर रात्री ११ वाजता आव्हाणे येथील गिरणा पदीपात्रावर पाहणी केली असता. नदीपात्रात १० ते १२ डंपर व ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा सुरु  होता. वाळू व्यावसायिकांकडून रात्री ९ वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात डंपर उतरवले जातात. 

पहाटे ६ सहावाजेपर्यंत सुरु असते वाळू वाहतूकरात्री ९ वाजेपासून सुरु झालेली  वाहतूक सकाळी ६ वाजेपर्यंत सुरु असते.  पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्यावर पाहणी केली असता. फक्त अर्ध्यातासाच्या अवधीत सुमारे १२ ते १५ डंपर वाळूने भरुन गेले. तसेच सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास खेडी येथून २ ट्रॅक्टर वाळूने भरून गेल्याचे चित्र पहायला मिळाले. 

खेडी, फुपनगरी, आव्हाणे परिसरात सर्वाधिक उपसाआव्हाणे येथील वाळू ठेक्याचा दोन वर्षांपासून ग्र्रामस्थांनी विरोध केल्यानंतर येथील ठेक्याचा लिलाव करण्यात आलेला नाही. मात्र तरीही येथील नदीपात्रातुन सर्वाधिक वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. आव्हाणे ग्रामस्थांनी नदीकडे जाणाºया रस्ता बंद केला असला तरी मात्र बांभोरी व निमखेडी परिसरातून ही वाहतूक सुरु आहे. तर खेडी व फुपनगरी येथील गिरणा नदीपात्रातुन देखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. 

प्रशासनाच्या अधिकाºयांवर देखील असते नजररात्री वाळू उपश्यासाठी डंपर नदीपात्रात उतरविल्यानंतर वाळू व्यावसायिकांचे अनेक पंटर रात्रभर पहारा देत बसविले जातात. कानळदा रस्त्यालगतच्या के.सी.पार्क परिसरात रात्री ८ ते १० वाळू व्यावसायिक बसले होते. तर खेडी फाटा व शहरातील गुजराल पेट्रोल पंप शेजारी देखील अनेक पंटर बसलेले दिसून आले. तहसीलदार किंवा महसुल विभागातील अधिकाºयांची गाडी नजरेस पडल्यावर लगेच नदीपात्रातुन डंपर इतरत्र हलविले जातात.