शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात पंधरा दिवस रात्री १२पर्यंत वाजवा रे वाजवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST

जळगाव : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्‍हाधिकारी ...

जळगाव : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी मिळालेल्या सवलतीचा लाभ घेताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रात्री १० पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी असते. परंतु, सण, उत्सवासाठी वर्षभरात १५ वेगवेगळ्या दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत वाजविण्यास सरकारने परवानगी दिली आहे. हे १५ दिवस कोणते, ते ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ याकाळात रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सूट असलेले सण, उत्सवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महाराष्ट्र दिवस (१ मे), गणेशोत्सव पाचवा दिवस (१४ सप्टेंबर), गणेशोत्सव सातवा दिवस (१६ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (१९ सप्टेंबर), नवरात्रोत्सव अष्टमी (१३ ऑक्टोबर), नवमी (१४ ऑक्टोबर), ईद-ए-मिलाद (१९ ऑक्टोबर), दीपावली (४ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर), वर्षअखेर (३१ डिसेंबर) आदींचा समावेश आहे. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांच्या मान्‍यतेनुसार महत्त्वाच्‍या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे.

आदेशातील बाबींचे पालन करावे

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी सूट देताना उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सवलत राज्य शासनाकडून घोषित शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहणार आहे.