शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील हॉटेलमध्ये प्लास्टिकचा तांदूळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:47 IST

अन्न व प्रशासन विभागाने घेतले नमुने : हॉटेल चालक, दुकानदारांकडून मात्र इन्कार

ठळक मुद्देहॉटेलमधून घेतलेले तांदळाचे नमुने प्रयोग शाळेतसोशल मीडियावर दिवसभर चर्चा महिनाभरात अहवाल येईल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 -  शहरातील  एका हॉटेलमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉटेलमधून तांदळाचे नमुने घेतले आहे. दरम्यान, शहरात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने दिवसभर हा चर्चेचा विषय होता. प्लास्टीकचा तांदूळ असणे शक्य नसल्याचे संबंधित हॉटेल  व दुकान मालकाचे म्हणणे आहे.शहरातील एका हॉटेलमध्ये प्लास्टिकच्या तांदळाचा वापर होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉटेलमधून तांदळाचे नमुने घेतले. हॉटेलमधून घेतलेले तांदळाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा महिनाभरात अहवाल येईल व त्यानंतर अधिक चौकशी केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या बाबत हॉटेलमध्ये चौकशी केली असता, नमुने घेतले असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापकांनी मान्य केले. मात्र प्लास्टिकचा तांदूळ जळगावात असणे शक्य नसल्याचेही सांगितले. शहरातील एका दुकानावर  प्लास्टिक तांदूळ विक्री होत असल्याचे संदेश शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.  या बाबत संबंधित दुकानमालकांकडे चौकशी केली असता ते म्हणाले, देशभरात कोठेच प्लास्टिक तांदूळ नाही. तो आमच्याकडे व शहरात असणे शक्य नाही. या बाबतचा लॅबचा अहवाल व इतर पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात आपण कायदेशीर बाजूने काम करीत असून या विषयी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार असल्याचेही दुकानमालकांनी सांगितले. आपणास बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.