शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळ्यात आगीत २ भावांचा संसार खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 13:10 IST

दिव्यामुळे लागली आग

जळगाव : पिंप्राळा येथील धनगर वाड्यात अशोक विश्राम धनगर व शंकर विश्राम धनगर या दोन्ही भावंडाच्या घराला मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता अचानक आग लागली. घरात सरपण असल्याने क्षणातच दोन्ही भावंडांचा संसार खाक झाला. अशोक याला दुपारीच कामाची मजुरी मिळाली होती तर त्याच्या आईनेही घरात काही रक्कम गोळा करुन ठेवली होती. ती आगीत खाक झाली.पिंप्राळा येथील धनगर वाड्यात अशोक व शंकर या दोन्ही भावांचे घर शेजारीच आहे. अशोकच्या घरात दिवाळीचा दिवा लावण्यात आला होता. घरात कोणीच नसताना हा दिवा सरपणावर पडला व क्षणातच मोठी आग लागली. आगीचे लोळ पाहताच शेजारच्या घरात असलेली आई मिराबाई, सून व मुलगा शंकर यांनी घराबाहेर धाव घेतली. शेजारील लोकांनी तत्काळ धाव घेत मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी पत्रेही काढण्यात आली. अग्निशमन दलाचे दोन बंब मागविण्यात आले होते. राजेंद्र सदाशिव पाटील या तरुणाने जीव धोक्यात घालून घरातील गॅस सिलिंडर बाहेर सुरक्षितरित्या हलविले.आगीच्या धक्क्याने तरुण बेशुध्दघरात आग लागली व संसार खाक झाल्याचा मोठा धक्का बसल्याने अशोक जागेवरच बेशुध्द पडला. त्याला लोकांनी तातडीने खासगी दवाखान्यात नेले. तेथे उपचार केल्यानंतर तो शुध्दीवर आला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक आबा कापसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट देवून धनगर कुटुंबाला तातडीची पाच हजाराची तर कापसे यांनी प्रत्येकी दोन हजाराची मदत दिली. नगरसेवक विजय पाटील यांनीदेखील या कुटुंबाला मदत जाहीर केली.