आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.३ - मुलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या तालुक्यातील पिंपळी येथे ग्रा.पं.च्या उत्तरकार्याचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत ग्रा.पं.सदस्यांना मारहाण केल्याप्रकरणी सरपंच व त्यांच्या गटातील २३ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहेमनोज महाजन यांच्या पत्नी तथा ग्रामपंचायत सदस्या मनीषा मनोज महाजन यांनी फिर्याद दिली आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत वारंवार पाणी टंचाई बाबत समस्या मांडूनही उपाययोजना केलेली नाही म्हणून ग्रामपंचायत आहे की नाही यासाठी २ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायतींचे उत्तरकार्य करीत असताना माजी सरपंच राजेंद्र पाटील त्यांची पत्नी तथा सरपंच जयश्री पाटील, इंदूबाई पाटील, सुनीता सावंत, आशा सोनवणे, हिम्मत मोरे, नीलेश महाजन, दौलत नाईक, नितीन बहिरम, प्रेमचंद बहिरम, सुभाबाई बहिरम, आशाबाई भिल, विठ्ठल सोनवणे, आक्काबाई सोनवणे, भास्कर सोनवणे, आबा बहिरम , राजेंद्र भिल, मनोज महाजन, सुनंदा बाविस्कर, विमल सोनवणे, सुनंदा सावंत, सुनंदा मोरे, ऋषीकेश बहिरम यांच्यासह १० ते १२ जणांनी फिर्यादी व त्यांचे पती मनोज महाजन याना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाद सोडविण्यासाठी आलेल्या वैशाली महाजन, गुलाब महाजन यांनाही मारहाण केल्याचे म्हटले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला २३ जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, ३२३, ५०४ प्रमाणे दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे. तपास उपनिरीक्षक गोकुळ पाटील करीत आहेत.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाºया पिंपळी सरपंचाविरूद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:14 IST
पिंपळी (ता.अमळनेर) ग्रामपंचायतीकडून मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रा.पं.च्या उत्तरकार्याचा कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजित केला होता. या दरम्यान सरपंच व त्यांच्या २३ समर्थकांनी मारहाण केल्याची फिर्याद ग्रा.पं.सदस्या मनिषा महाजन यांनी केली आहे.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाºया पिंपळी सरपंचाविरूद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा
ठळक मुद्देपिंपळीच्या महिला ग्रा.पं.सदस्यांनी केले होते आंदोलनसरपंच व त्यांच्या पतीने मारहाण व शिविगाळ केल्याचा आरोपपाणी टंचाई व मुलभूत सुविधांबाबत मासिक सभेत विचारणा केल्यानंतरही होत नाही समस्येचे निवारण