शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री एकनाथराव खडसेंचाही फोन टॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:35 IST

माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रकार अत्यंत दुर्दैवीकोणाचेही फोन टॅप होणे योग्य नाही

मुक्ताईनगर, जि.जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप झाल्याप्रकरणी चौकशी सुरू असताना भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप झाल्याचा प्रकार उघडकीस असल्याचा दावा वजा वृत्त दोन इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार दुर्दैवी असून, माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी नवी दिल्लीतून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांसह विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. या अनुषंगाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने या प्रकरणात चौकशी कामी उच पदस्थ अधिकाऱ्यांच्या द्वि सदस्य चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करून सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आहे. फोन ट्ॅपिंग प्रकरणात चौकशी सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्ष नेत्यांसह चक्क स्वपक्षीय नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचेदेखील फोन टॅप केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे वृत्त इंग्रजी दैनिकात आले आहे.भाजप पक्षातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांची अंदरकी बात बाहेर आली आहे आणि मोठी खळबळ उडाली आहे.फोन टॅप झाले असेल तर दुर्दैवी आहे. हे मी इंग्रजी वृत्तपत्रात वाचले. मला तर तसे वाटत नाही, माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नाही. नैतिकतेला धरून नाही. असे व्हायला नको पाहिजे होतं. त्यातल्या त्यात मी तर पार्टीचा माणूस आहे. आपल्याच माणसाचे फोन टॅप केले गेले असतील तर दुर्दैवी आहे.-एकनाथराव खडसे, माजी मंत्री

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर