शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल शंभरी पार, १००.१० रुपयांवर भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 22:39 IST

पाच महिन्यात साडे आठ रुपयांनी महाग : डिझेलही ९० रुपयांच्या पुढे जळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने भाव वाढ ...

पाच महिन्यात साडे आठ रुपयांनी महाग : डिझेलही ९० रुपयांच्या पुढे

जळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने भाव वाढ होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भावात रविवारी पुन्हा एकदा वाढ होऊन पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. या भाववाढीने पेट्रोल १००.१० रुपये प्रति लिटर झाले आहे तर डिझेलचे भाव देखील ९० रुपयांच्या पुढे जाऊन ते रुपये ९०.२० प्रति लिटर झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भावदेखील रविवारी वाढल्याने पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.नोव्हेंबर २०२० पासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये एप्रिल महिन्याचा थोडासा दिलासा वगळता इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनदेखील पेट्रोल डिझेलचे भाव चांगलेच वाढत गेले. १ जानेवारी ते १६ मे यादरम्यान  पेट्रोलचे भाव पाहिले असता ते ८.५२  रुपये प्रति लिटरने तर डिझेलचे भाव ९.७९ रुपये प्रति लिटर लिटरने वाढले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल ९१.५८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८०.९० प्रतिलिटर होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९४.०६ रुपये प्रति लिटर, १ मार्च रोजी ९८.६१ रुपये प्रति लिटर असे सातत्याने वाढत गेले. त्यासोबतच मे महिन्यात देखील पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. ४ मे रोजी ९७.८७ रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल आठवडाभरात ११ मेपर्यंत ९९.३५ प्रति लिटरवर पोहोचले. तेव्हापासून ही वाढ होत रविवार, १६ मे रोजी पेट्रोलने अखेर शंभर रुपयांचा आकडा पार करीत १००.१० रुपये प्रति लिटरवर ते पोहचले. यासोबतच डिझेलदेखील ९०.२० प्रति लिटरवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव पाहिले असता नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ते अडीचपटीने वाढले आहे.  डिसेंबर २०२० मध्ये ३९.०८ डॉलर असलेले भाव आता ६५.३७ डॉलरवर पोहोचले आहे. रविवारी कच्च्या तेलाचे भाव २.४३ डॉलरने वधारले.

टॅग्स :Jalgaonजळगाव