शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘गोलाणी’च्या ठरावाविरोधातील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:38 IST

जळगाव : तत्कालीन न.पा.ने गोलाणी मार्केटच्या ठेकेदाराला ठराव करून पेमेंट दिल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्या. कानडे व न्या.पाटील यांच्या खंडपीठाने गुरूवारी फेटाळली.

जळगाव : तत्कालीन न.पा.ने गोलाणी मार्केटच्या ठेकेदाराला ठराव करून पेमेंट दिल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्या.व्ही.एम. कानडे व न्या.एस.एस. पाटील यांच्या खंडपीठाने गुरूवारी फेटाळली. मालमत्तेची किंमत अनेक पटींनी वाढली असल्याने तसेच मनपाला गाळे भाडय़ाचे उत्पन्नही मिळत असल्याने मनपाचे नुकसान झालेले नसून फायदाच झालेला असल्याचे मनपाने स्पष्ट केल्याने तसेच या प्रकरणात सुमारे 20 वर्षाचा कालावधी उलटल्याने आता हस्तक्षेप करणे अवघड असल्याचे मत नोंदवित न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याची माहिती मनपाचे वकील अॅड.पी.आर.पाटील यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून बोलताना दिली. तत्कालीन नगरसेवक छबीलदास खडके व नरेंद्र पाटील यांनी 1997 मध्ये दाखल केलेली ही याचिका आधीही उच्च न्यायालयाने फेटाळली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचाराचे आदेश दिल्याने यावर पुन्हा कामकाज झाले होते.  तक्रारदार खडके व नरेंद्र पाटील यांच्यातर्फे अॅड.विनायकराव दीक्षित, सुरेशदादा जैन यांच्यातर्फे अॅड.पी.एम. शहा, अॅड.सुबोध शहा, तर मनपातर्फे अॅड.पी.आर.पाटील यांनी बाजू मांडली. त्यात मनपाने हे गाळे 6 कोटी रूपये मोजून ताब्यात घेतले मात्र आता त्याचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. ऑफीसचे दर 4950 रूपये प्रति चौरस फूट तर दुकानांचे 10 हजार 120 रुपये प्रति चौरस फूटांर्पयत पोहोचले आहेत. त्यासोबतच मनपाला गाळेभाडेही मिळत आहे. त्यामुळे मनपाचे नुकसान झालेले नसून फायदाच असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने मनपा प्रशासनाचे काही म्हणणे नाही, तसेच या प्रकरणात सुमारे 20 वर्षाचा कालावधी लोटल्याने आता त्यात हस्तक्षेप करणे अवघड असल्याचे सांगत ही याचिका फेटाळल्याची माहिती अॅड.पी.आर. पाटील यांनी दिली. लेखापरिक्षण करून दिली होती तक्रारयाच प्रकरणात तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनीही न्यायालयाचे कुठलेही आदेश नसताना लेखापरिक्षण करून तक्रार दिली होती. विशेष लेखापरिक्षण अहवाल नसल्याने ती पोलिसांनी नाकारल्याने  विशेष लेखापरिक्षण करून घेतले होते.