जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून शहरातही मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव तालुका हा गेल्या तीन दिवसांपासून सेफ झोनमध्ये असून सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ ने कमी होऊन २५ वर आली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी अमळनेर १, चोपडा २, भुसावळ २, चाळीसगावात ६ रुग्ण आढळून आले आहेत. अन्य ठिकाणी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचे मृत्यू थांबल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला आहे. दरम्यान, मंगळवारी अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची संख्या वाढून ८ वर गेली आहे. जिल्ह्यात एकूण ११४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी चाळीसगावात सर्वाधिक ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी आरटीपीसीआरचे १६०० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ बाधित आढळून आले तर ॲन्टीजनच्या १६६० तपासण्या झाल्या यात ९ बाधित आढळून आले आहेत.