शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक अधिकाऱ्यांनाही टक्केवारीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:32 IST

साडे पाच कोटीचे फसवणूक प्रकरण

ठळक मुद्दे अटकेतील तिन्ही बिल्डरांना दोन दिवस कोठडी

जळगाव : बांधकाम व्यवसायासाठी लागणारे यंत्र खरेदीसाठी कर्ज घेताना बनावट कोटेशन सादर करुन पंजाब नॅशनल बॅँकेकडून ५ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज लाटल्याच्या प्रकरणात मदत करणाºया बॅँकेच्या मुख्य प्रबंधकांनाही काही विशिष्ट टक्केवारीचा लाभ झाल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. दरम्यान, अटकेतील तीन्ही बिल्डरांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.बनावट कोटेशन सादर करुन कर्ज लाटल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कमल खेमचंद चौधरी, लीना जयेश नेहते, शैला उमाकांत नेहते, सोहन उमाकांत नेहते, जयेश उमाकांत नेहते, उत्तम तुळशीराम चौधरी, बॅँकेचे तत्कालीन मुख्य प्रबंधक अरुण आर्या व संजय सिताराम लोणारे यांच्याविरुध्द कलम मंगळवारी शहर पोलीस स्टेशनला ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोहम उमाकांत नेहते, जयेश उमाकांत नेहते (दोन्ही रा.गुरुकुल कॉलनी, जळगाव) व उत्तम तुळशीराम चौधरी या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. बुधवारी त्यांना न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.तिघांचे घेतले जबाबपोलिसांनी बुधवारी अटकेतील सोहम नेहते, जयेश नेहतेव उत्तम चौधरी या तिघांचे जबाब घेतले. त्यात त्यांनी आम्ही कर्ज प्रकरण घेताना बनावट कोटेशन सादर करण्याचे मान्य केले असून ही रक्कम बांधकामाच्या ठिकाणी वापरल्याचे सांगितले आहे.अन्य बॅँकाही चौकशीच्या फेºयातनेहते व चौधरी यांनी ज्या बॅँकात खाते उघडून कर्जाचे पैसे काढले, त्या बॅँकाही चौकशीच्या फेºयात आहेत. बॅँकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कमा कशा वितरीत केल्या याची पोलीस चौकशी करणार आहेत. त्याशिवाय बंगळुरु व बडोदा (गुजरात) येथील कंपनींचे कोटेशन सादर झाल्याने तेथेही पोलीस चौकशीसाठी जाणार आहेत. याव्यतिरिक्त अन्य कोणत्या बॅँकाना बनावट कोटेशन सादर केले आहे किंवा त्यांच्याकडून कर्ज घेतले आहे याची चौकशी केली जाणार आहे. बॅँकेचे तत्कालिन अधिकारी अरुण आर्या व संजय लोणारे यांनी या प्रकरणात जाणूनबुजून दुर्लक्ष करुन कर्ज प्रकरणे मंजूर केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे.