शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रस्त्याच्या मध्‍यभागी उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्‍यास सांगितल्याचा राग येऊन बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रस्त्याच्या मध्‍यभागी उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्‍यास सांगितल्याचा राग येऊन बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी दोघा आरोपींना दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमुजरीचीही शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली. अनिल भाईदास भोपे व प्रवीण यशवंत सावंत (दोन्ही रा. कासोदा, ता. एरंडोल) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

एरंडोल डेपोतील एसटी बसचालक प्रवीण सुरेश बडगुजर हे २३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रवाशांना घेऊन एरंडोल आगारात जात होते. अनिल भोपे व त्याच्या सोबत असलेला प्रवीण सावंत यांनी एरंडोल नगरपालिका बगिचासमोर रस्त्याच्या मध्‍यभागी रिक्षा उभी केली होती. एसटी बस सायंकाळी ५.४५ वाजता बगिचाजवळून गेली. त्यावेळी चालक बडगुजर यांनी भोपे व सावंत यांना रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग येऊन दोघांनी बस चालकास बाहेर ओढून बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर बस चालकाच्या तक्रारीनंतर एरंडोल पोलिसांत मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला होता.

सहा साक्षीदार तपासले

याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश एस.एम. माने यांच्या न्यायालयात खटला चालला. त्यात सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्‍यात आले. अखेर शुक्रवारी न्यायालयाने अनिल भोपे व प्रवीण सावंत यांना भादंवि कलम ३५३, ३२३ व ५०४ नुसार दोषी ठरवून त्यांना दंडांची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीचीही शिक्षा ठोठावली आहे.

अशी आहे शिक्षा

दोन्ही आरोपींना भादंवि कलम ३५३ नुसार प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची कैद तसेच कलम ३२३ प्रमाणे प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी व कलम ५०४ नुसार प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, दंडाच्या रकमेतून फिर्यादीस २५ हजार रुपये देण्‍याचेही आदेश न्यायालयाने केले आहेत. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.