शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करा : शिक्षकांची मागणी

By admin | Updated: January 11, 2017 00:44 IST

महिनाभर काम करून हजार-दोन हजारांवर रक्कम जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने आमचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिका:यांकडे केली आहे.

धरणगाव : ‘नोटबंदी’च्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची गंभीर स्थिती झाली असून खातेदार, पगारदार, शेतक:यांना पुरेसा पैसा देण्यास बँक असमर्थ ठरत आहे. महिनाभर काम करून हजार-दोन हजारांवर रक्कम जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने आमचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिका:यांकडे केली आहे.सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आठवडय़ातून 24 हजार रुपये बँकांनी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र तालुक्यातील जिल्हा बँकांच्या शाखांमधून कुठून दोन हजार, कुठून हजार रुपये तर कुठून पाच-दहा हजार रुपये मिळत आहेत. जिल्हा बँकेच्या शाखेत गेल्यावर अनेकदा पैसे नसल्याचे सांगितले जाते, तर कधी दोन/चार हजार रुपये घेऊन घरी यावे लागते. त्यामुळे संसाराचा गाडा हाकविणे, वीज बील, कर्जाचे हप्ते भरणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची मागणी माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्याकडे केली आहे.शिक्षणाधिका:यांनी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकांमार्फत होण्यासाठी प्रयत्न करावेत व शिक्षकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.माध्यमिक शिक्षक पतपेढीतून कर्ज काढल्यानंतर वा पीएफचे कर्ज काढल्यानंतर अथवा सेवानिवृत्तीनंतर मिळणारी अनेक शिक्षकांची रक्कम जिल्हा बँकेत जमा झाली असून, ज्या कामासाठी पीएफचे वा पतपेढीचे कर्ज शिक्षकांनी काढले आहे. त्यासाठी  वेळेवर जिल्हा बँकेकडून रक्कम मिळत नसल्याने शिक्षक वा इतर पगारदार चिंताग्रस्त झाले आहेत. कर्जाचे व्याज सुरू झाले तरी रक्कम मात्र जिल्हा बँकेत अडकून पडल्याने त्यांचे व्याज वाढत आहे. (वार्ताहर)जिल्हा बँकेतून गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक शिक्षकांचे पगार होत आहेत. मात्र गेल्या दोन/तीन महिन्यांपासून जिल्हा बँक शिक्षकांच्या पगाराची रक्कम देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीयकृत बँकेतून पगाराची व्यवस्था करण्याची आमची मागणी आहे.- जाकीर पटेल, शिक्षक, नीळकंठेश्वर विद्यालय, चावलखेडा, ता.धरणगाव