शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात तूर-हरभऱ्याच्या खरेदीचे अद्यापही ३ कोटींचे पेमेंट बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:32 IST

शेतकरी हवालदिल

ठळक मुद्दे नवीन उडीद-मूग खरेदी केंद्रांसाठी हालचाली आॅनलाईन नोंदणी सुरु होणार

जळगाव : खरीप हंगामातील नवीन उडीद मूग, सोयाबीनसाठी खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झालेल्या असताना १३ जूनपर्यंत खरेदी केलेल्या तूर-हरभºयाचे अद्यापही ३ कोटींचे पेमेंट बाकी आहे. निधी संपल्याने पेमेंट वाटप रखडले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासनाने मागील हंगामात जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करून त्याद्वारे हमीभावाने आधी उडीद-मूगाची व नंतर तूर, हरभºयाची खरेदी केली होती. तूर व हरभरा खरेदी १३ जून २०१८ पर्यंत चालली. जिल्ह्यात सुमारे ८३ कोटी रूपये किंमतीच्या तूर व हरभºयाची खरेदी या हमीभाव केंद्रांवरून करण्यात आली. त्यानंतर तीन महिने उलटले तरीही अद्याप ३ कोटींचे पेमेंट शेतकºयांना अदा करणे बाकी आहे. आजपर्यंत ८० कोटींचे पेमेंट अदा करण्यात आले आहे. मध्यंतरी निधीच शिल्लक नसल्याने शेतकºयांचे पेमेंट अडकले होते. मागील आठवड्यात राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने पुन्हा पेमेंट अदा करणे सुरू झाले आहे. काही श्ोतकºयांच्या बँक खात्यांचे क्रमांकही चुकले होते. त्यांचेही पेमेंट अडकले होते. ते देखील दुरूस्ती करून अदा करण्याचे काम सुरू आहे.आॅनलाईन नोंदणी सुरु होणारशासनाकडून अद्याप नवीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश आलेले नसले तरीही मार्केटिंग फेडरेशनतर्फे तशी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संस्थांकडून खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सध्या उडीद व मुगासाठी अमळनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. बाकीचे तालुके त्यांना जोडले जातील. खरेदी केंद्र नि िश्चत झाल्यानंतर शेतकºयांकडून आॅनलाईन नोंदणी सुरू होणार आहे.हमीभाव जाहीर...शासनाने हमीभाव जाहीर केले असून मूगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० तर सोयाबीनला ३३०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे.