शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडून रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:33 IST

चालकाला मारहाण :संतप्त नातेवाईकांकडून गाडीची तोडफोड

कुरंगी, ता. पाचोरा : रुग्णाला जळगाव येथे घेऊन जात असताना रस्त्यातच सामनेरच्या पुढे रुग्णवाहिका बंद पडल्याने त्या गाडीत असलेल्या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांनी संतप्त होऊन रुग्णवाहिकेची तोडफोड केल्याची घटना २६ रोजी सकाळी घडली.याबाबत वृत्त असे की, पाचोरा येथून रुग्णाला जळगाव येथे घेऊन जात असलेली रुग्णवाहिका सामनेर गावाच्या पुढे व पाथरी जवळ सकाळी साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान बंद पडली. गाडीमध्ये असलेल्या रुग्णाला जास्त त्रास जाणवत असल्याने त्याचा त्याठिकाणी जागीच मृत्यू झाल्याने गाडीतील संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. कुºहाड तालुका पाचोरा येथील रुग्ण दामू श्रावण पवार (६०) हे पाचोरा येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना जळगावला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर पाचोरा येथून जळगाव घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला (एमएच ०५ /आर ०६६१) फोनवरून बोलविले. रुग्णास जळगाव कडेनेत असताना ही घटना घडली. या घटनेबाबत म्हसावद पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गुरुवारी झालेल्या घटनेतील रुग्णवाहिकेचा परवाना आहे का ? याबाबत पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.खिशातून पैसे काढल्याचा चालकाचा आरोपरुग्णवाहिकेची घटनास्थळी तोडफोड केली तर चालकाला मारहाण करून त्यांच्या खिशातून सहा हजार रुपये काढून गाडीची चावी काढून घेतली व गाडीमध्ये असलेली आॅक्सिजन हंडीही सोबत घेऊन गेल्याचे गाडी मालक भागवत पाटील (पाचोरा) यांनी ‘लोकमत’ला सांगितले.