शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात पुजाऱ्याला मारहाण करीत मंदिरातील ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:24 IST

पारोळा शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून साने गुरुजी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यानी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. तर शहरातील छोटे राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून चांदीचे दागिने व पैसे लंपास केल्याची घटना घडली .

ठळक मुद्देशालकाच्या लग्नातील सोन्यावरच चोरट्यांचा डल्लाश्वानपथकाला पाचारण, पण माग नाही

पारोळा : येथील साने गुरुजी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यानी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. तर शहरातील छोटे राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून चांदीचे दागिने व पैसे लंपास केल्याची घटना घडली .शहरात गेल्या दोन दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. परवा न्यू बालाजीनगरमध्ये एका अभियंत्याचे घर चोरट्यांनी लक्ष्य केले होते. आणि त्या पाठोपाठ लगेच दुसºया दिवशी साने गुरुजी कॉलनीत हर्षल सुधाकर पाटील यांच्या बंद घराला चोरांनी लक्ष्य करीत, सहा लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. एवढेच नव्हे तर छोट्या राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून दागिने चोरून नेले. त्यामुळे पुन्हा पारोळा शहरातील खाकीचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.२१ रोजी पहाटे शहरातील साने गुरुजीनगरमधील रहिवासी आणि ट्रान्सपोर्टचे मालक हर्षल सुधाकर पाटील यांच्या मामीचे निधन झाले होते. त्यामुळे ते पत्नीसह अंत्ययात्रेसाठी २० रोजी सायंकाळी सहा वाजता काळखेडा, जि. धुळे येथे घर बंद करून गेले होते. या बंद घराला लक्ष्य करीत अज्ञात चोरट्यानी मध्यरात्रीनंतर घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील बेडरूममधील कपाटातील सोन्याची पट्टी, नेकलेस, तीन गोफ, २० अंगठ्या, मंगलपोत, कानातले, टोंगल, चांदीच्या वस्तू अश्या एकूण सुमारे वीस तोळे सोने व पंच्चावन्न हजार रुपये रोख असा सहा लाख चाळीस हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. ही बाब सकाळी शेजारच्या लोकांच्या लक्षात आली असता त्यांनी हर्षल पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सुधीर चौधरी, पंकज राठोड, सुनील साळूंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व जळगाव येथील श्वान पथक, हस्त ठसेतज्ञाना पाचारण केले होते. तथापि श्वान पथक परिसरातच घुटमळत राहिले. या प्रकरणी हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. कॉ. बापू पाटील करीत आहेत.दरम्यान, चोºयांचे वाढते सत्र पाहता पोलिसांनी रात्रीची गस्त कडक करावी अशी मागणी शहरवासियांतर्फे केली जात आहे.शालकाच्या लग्नातील सोन्यावरच डल्लाहर्षल पाटील यांच्या शालकाचे लग्न जमले असून लग्नासाठी खरेदी केलेल्या सोन्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

टॅग्स :Robberyदरोडा