शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट मशीन वेळेवर न मिळाल्याने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:33 IST

पाचोरा येथे प्रवासी संतप्त, कारवाईची मागणी

ठळक मुद्देपाचोरा आगारात 57 बसेस असून 602 फे:या आहेत. 121 कंडक्टर, 145 चालक आहेत. इश्यू क्लार्कची डय़ूटी ही पहाटे साडेपाचला असते. मात्र ते उशिरा आल्याने सुमारे 35 बसेस खोळंबल्या. तसेच पुणे, नवापूर व धुळ्याकडे जाणा:या बसेस एक ते दीड तास खोळंबल्या. पाचोरा-सुरत ही बस रद्द करण्याची वेळ आगारावर आली. या बससाठी चालक एका कर्मचारी संघटनेचा, तर वाहक दुस:या कर्मचारी संघटनेचा यामुळे ही बसच सुरतकडे रवाना झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

लोकमत ऑनलाईन पाचोरा, जि.जळगाव, दि. 1 : पाचोरा आगारात इश्यू क्लार्कमार्फत तिकीट वाटप मशीन वेळेवर न मिळाल्याने बसेस रविवारी सकाळी आठ वाजेर्पयत खोळंबून होत्या. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त करीत आगार व्यवस्थापनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवास करताना प्रवाशाला एका विशिष्ट मशिनद्वारे वाहक तिकीट देत असतात. हे मशीन आगारात इश्यू क्लार्क (तिकीट मशीन वाटप करणारे) मार्फत वाहकांना उपलब्ध करून देण्यात येते. नंतरच वाहक बसेस पुढील प्रवासासाठी रवाना करतात. पहाटेपासूनच हे तिकीट मशीन देण्यात येते. इश्यू क्लार्क विनोद पवार गैरहजर होते. त्यामुळे सकाळी डय़ूटीवर आलेल्या वाहक-चालकांना मशीन मिळाले नाही. बसेस ताटकळत उभ्या होत्या. प्रवाशी ओरड करीत होते. आगाराचे प्रभारी व्यवस्थापक अनिल बेहरे यांनी इश्यू क्लार्कची जबाबदारी एका कंडक्टरवर सोपविली. नंतर कंडक्टर कपिल पाटील यांनी 8 वाजेपासून मशीन वाटप करीत गाडय़ा रवाना केल्या. यामुळे पहाटेपासून आलेल्या प्रवाशांना सकाळी आठर्पयत ताटकळत थांबावे लागले. अनेक बसेस उशिरा धावण्याच्या प्रकारामुळे पाचोरा आगाराचे हजारो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. प्रवाशांच्या भावनांशी खेळणा:या या आगारातील अधिकारी व कर्मचा:यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे.