शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

प्रवाशी चोरट्याने पळविली कार

By admin | Updated: March 5, 2017 00:03 IST

जळके गावाजवळ दुसरी घटना : भुसावळचे नाव सांगून मुंबईहून भाड्याने आणली कार

जळगाव : भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून एका चोरट्याने मुंबई येथून कार भाड्याने घेतली व जळके गावाजवळ लघु शंकेला थांबला असता तेथे मोबाईल पडल्याचा बहाणा करीत चालकाला मोबाईल घेण्यास खाली उतरवून कार घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता जळके गावाजवळ  घडली. दोन महिन्यांपूर्वी जळके गावाजवळ अशीच घटना घडली होती. सलग दुसºयांदा घटना घडल्याने खळबळ उडालीआहे.आरडाओरड करुनही उपयोग नाहीप्रवाशी म्हणून आलेल्या चोरट्याने कार पळविल्याचे लक्षात आल्यानंतर दास यांनी आरडाओरड केली, मात्र पहाटेच्या सुमारास रस्त्यावर कोणीच नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी जळके गावाजवळ येवून ग्रामस्थांच्या मदतीने दास यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून उपनिरीक्षक एन.बी. सूर्यवंशी व रतिलाल पवार यांच्याकडे हकीकत कथन केली. या गाडीची किंमत चार लाख रुपये असल्याचे दास यांनी सांगितले. कारसह दोन मोबाईलही त्याने लांबविले आहेत.लघु शंकेला थांबला अन् मोबाईल पडल्याचा बहाणा करीत चालकाला दिला चकवायाबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विक्रम धिरेंद्र दास (वय ४० रा.भार्इंदर, जि.पालघर) यांचा टॅक्सी टुरीस्टचा व्यवसाय आहे. १ मार्च रोजी एका व्यक्तीने फोन करुन भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून कार बुक केली. त्यानुसार ३ मार्च रोजी रात्री ९ वाजता विक्रम दास हे कारसह (क्र.एम.एच.०२ सी.आर.१८८७) कल्याण-भिवंडी नाका येथे पोहचले. तेथून संबंधित व्यक्तीला घेवून ते भुसावळकडे रवाना झाले. पुढे नाशिक शहराजवळ कारमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर दास हे मालेगावजवळ एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले, मात्र चोरटा कारच्या खाली उतरला नाही. जेवण आटोपल्यानंतर धुळे, एरंडोल व म्हसावदमार्गे येत असताना जळके गावाजवळ लालू वंजारी यांच्या शेताजवळ चोरट्याने लघुशंकेसाठी कार थांबवली. लघुशंकेनंतर पुन्हा तो कारमध्ये बसला व शंभर फुटाजवळ कार नेल्यानंतर कारमध्ये बसताना बाटली व मोबाईल पडला आहे असे सांगून पुन्हा कार थांबविली व त्या वस्तू घेण्यास दास यांनाच पाठविले. दास हे तिकडे जायला निघताच चोरट्याने कार पळविली. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी मागील गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढायला सुरुवात केली आहे.आरोपी व ठिकाण एकचगेल्या दोन महिन्यापूर्वी जळके गावाजवळ अशीच घटना घडली होती. तेव्हाही चोरट्याने जामनेरला जायचे आहे असे सांगून मुंबई येथून कार भाड्याने आणली होती व त्याच जागेवरच लघुशंकेसाठी थांबवून कार घेवून पळ काढला होता. गुन्ह्णाची पध्दत पाहता या घटनेतही तोच आरोपी असल्याची शक्यता उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांनी वर्तविली आहे.उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सूर्यवंशी यांच्याकडून मागील गुन्हा व आताचा गुन्हा याबाबत माहिती जाणून घेत तपासाबाबत सूचना केल्या.