शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात माध्यमिक शिक्षक संघटना कोरोनाच्या मदतीला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

पारोळा कुटीर रुग्णालयासाठी प्रांताधिकारी यांनी कोरोनाबाधित रुग्णांना लोकसहभागातून मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व जनरेटर घेण्यासाठी मदत निधी ...

पारोळा कुटीर रुग्णालयासाठी प्रांताधिकारी यांनी कोरोनाबाधित रुग्णांना लोकसहभागातून मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व जनरेटर घेण्यासाठी मदत निधी जमा करावा, या दृष्टिकोनातून पारोळा तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी १ लाख १६ हजार रुपये मदत निधी जमा केला होता. या निधीतून कॉटेज हॉस्पिटलसाठी वीज गेल्यानंतर दाखल रुग्णांसाठी ऑक्सिजन नियमित सुरू राहावा, याकरिता इलेक्ट्रिक जनरेटरची आवश्यकता होती. ते जनरेटर या निधीतून घेण्यात येणार आहे. यासाठी याआधी किसान विद्या प्रसारक संस्थेकडून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी १ लाख रुपयांची मदत केली आहे तर प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे व विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते १ लाखाच्या मदतीचा धनादेश तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या लोकसहभागातून जमा करण्यात आलेल्या या निधीतून जनरेटर बसवण्यात येणार आहे.

यावेळी जमा झालेल्या निधीचा धनादेश तहसीलदार अनिल गवांदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे डॉ. मयूर पाटील यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, विस्तार अधिकारी सी. एम. चौधरी, नगरसेवक पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद माने, डॉ. शांताराम पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, मुख्याध्यापक कमलेश देवरे, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आर. पी. पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोरख पाटील, कला शिक्षक संघाचे अध्यक्ष एस. जी. झडप, क्रीडा युवा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संदीप पवार, अनिल वाघ, विश्वास वाघ, डी. बी. पाटील, नितीन मराठे, एस. आर. पाटील, सी. एम. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार टीडीएफचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले.

===Photopath===

010621\01jal_9_01062021_12.jpg

===Caption===

पारोळ्यात माध्यमिक शिक्षक संघटना कोरोनाच्या मदतीला सरसावल्या