शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

पारोळा बस स्थानक खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:10 IST

पारोळा : पहिल्याच पावसात येथील बस स्थानकात चिखलाचे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरण वेळीच न केल्यामुळे बस स्थानक ...

पारोळा : पहिल्याच पावसात येथील बस स्थानकात चिखलाचे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरण वेळीच न केल्यामुळे बस स्थानक खड्डेमय होऊन स्थानकाची दुरवस्था झाली आहे. याचा एसटीसह प्रवाशांना त्रास होत आहे.गेल्या काही दिवसांपासून पारोळा शहरात दमदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने संपूर्ण बस स्थानक चिखलमय झाले आहे. स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ मोठे मोठे खड्डे पडल्याने चिखलाच्या खड्ड्यात बस बसस्थानक अडकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना चिखलाचा सामना करून आत शिरावे लागते. गेल्या दहा वर्षांपासून येथे डांबरीकरण झालेले नाही. परिणामी या ठिकाणी उन्हाळ्यात मातीचा धुरळा व पावसाळ्यात चिखलाचा सामना प्रवाशांना करावा लागतो. याबाबत प्रवासी संघटनेने अनेकदा निवेदने देऊन बस स्थानकावर डांबरीकरणाची मागणी केली आहे. परंतु, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षाने स्थानकाची दुर्दशा झाली आहे.या खड्ड्यांमुळे चालकांनादेखील बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.बसस्थानकावर सकाळी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. ग्रमीण भागातून येणारे शालेय विद्यार्थी खड्ड्यात पायच घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही येथील चढउताराच्या जागेवरून चालताना त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळा जवळ येताच नागरिकांतून येथील कामांबाबत प्रशासनाकडे मागणी केली जाते. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींकडेही स्थानक सुशोभीकरणाबाबत नागरिकांनी मागणी केली होती.चालक, प्रवासी यांचेच होणारे हाल पाहता डांबरीकरणाच्या कामासह इतरत समस्यांकडे लक्ष देऊन स्थानक सुशोभित करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.