शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पालकांनो, मुलांना जपा! आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, दुसऱ्या लाटेत लहान मुले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, दुसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले असून, जिल्ह्यात शून्य ते २० वर्षापर्यंतच्या वयोगटात दोनच महिन्यांत ९९८ मुले, तरुण बाधित झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे यंदा नवजात बालकांमध्येही गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. जी याआधी आढळली नव्हती. एकंदरीत राज्यातच ही परिस्थिती असून, जिल्ह्यातही बालके बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

१५ फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मार्च महिन्यात झपाट्याने कोरोनाचा संसर्ग समोर आला. या संसर्गातून कोणत्याच वयोगटाच्या व्यक्ती सुटलेल्या नाहीत. शिवाय मृतांमध्ये तरुणांची संख्या वाढत असल्याचे गंभीर चित्र गेल्या महिनाभरात समोर आले आहे. नवजात बालकांवर उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यात सुरुवातीपासून काही नवजात बालकेही बाधित आढळून आली आहेत. त्यामुळे लहान मुलांना कोरोना होणार नाही, अशा गैरसमजात पालकांनी न राहता, मुलांना जपावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. शिवाय सध्या कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

मार्चमध्ये प्रमाण वाढले

दीड महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट धडकली असून, यात मार्च महिन्यात लहान मुले व तरुण बाधित होण्याचे प्रमाणही अधिक आहे. मार्च महिन्यातच एकत्रित रुग्णसंख्येचाही उच्चांक नोंदविण्यात आला होता. त्यातच जीएमसीत तीन नवजात बाळांना बाधित म्हणूनही सुरुवातीला दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या दीड महिन्यातच हे प्रमाण प्रचंड वाढल्याचे चित्र आहे.

दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील एका दोन वर्षीय बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शासकीय दरबारी होताच मोठी खळबळ उडाली होती. या बाळाला गंभीर न्यूमोनिया झाला होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह व दुसरा अहवाल बाधित आढळून आला होता. खासगी उपचार केल्यानंतर अखेर गंभीरावस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळांनाही गंभीर लक्षणे येत असून एका नवजात बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. सुदैवाने या बाळाला वाचविण्यात यंत्रणेला यश आले.